पुणे : भाजपाचे जेष्ठ नेते तथा विद्यमान गिरीश बापट यांनी आज प्राणज्योत मालवली. पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात त्यांनी वयाच्या ७२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
त्यांचे पार्थिव दुपारी २ ते ६ वाजेपर्यंत शनिवार पेठेतील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
सायंकाळी ७ वाजता वैकुंठ स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.
गिरीश बापट यांची प्रकृती गेल्या अनेक दिवसांपासून खालावली होती. त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करन्यात आले होते.
अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान त्यांच्या प्रकृती गंभीर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली होती. दरम्यान आज सकाळी त्यांचे निधन झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केल्या भावना
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्व. बापट यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
गंभीर आजारी असतांनाही पक्षाला ऊर्जा देण्याचे काम खा. बापट करीत होते. नुकतीच पुण्यात त्यांची भेट झाली होती. नगरसेवक ते खासदार व मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास होता. त्यांनी कायम सामान्य माणसाचे प्रश्न सोडविण्याचे काम केले. पुण्याच्या विकासात त्यांचे मोठे योगदान असल्याचे सांगितले.
** एम.डी.टी.व्ही. न्यूज ब्यूरो मुंबई