क्रिकेटचा देवही झाला प्रभावित ; शुभमनला दिला कानमंत्र !

0
192

अहमदाबाद: आयपीएल २०२३ मध्ये शुभमन गिलची बॅट चांगलीच तळपत आहे. शुभमन गिलची आयपीएल २०२३ मध्ये तीन शतके झाली आहेत. या मोसमापूर्वी त्याचे एकही शतक झाले नव्हते. ही तिन्ही शतके गेल्या ४ सामन्यांमध्ये झाली आहेत. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध पहिले शतक झळकावल्यानंतर गिलने पुढच्याच सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरविरुद्ध शतक झळकावले. तर कालच्या सामन्यात गिलच्या शतकाने मुंबई इंडियन्सला प्लेऑफमधून बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

गुजरात टायटन्सचा सलामीवीर शुभमन गिल मुंबई इंडियन्सविरुद्धच्या क्वालिफायर २ च्या सामन्यात चांगलाच बरसला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर शुभमन गिलने ४९ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याने ६० चेंडूत १२९ धावांच्या या खेळीत ७ चौकार आणि तब्ब्ल १० षटकार मारले. या खेळीनंतर ऑरेंज कॅपही गिलजवळ आली आहे. गिलच्या या स्फोटक फलंदाजीने क्रिकेटचा देवही प्रभावित झाला. सामना संपल्यानंतर गिलसोबत मास्टर ब्लास्टर काहीतरी बोलताना दिसला.

क्रिकेटचा देव मानला जाणारा सचिन तेंडुलकर हा मुंबई इंडियन्सचा मेंटॉर आहे. या सामन्यासाठी सचिन नरेंद्र मोदी स्टेडियमवर हजर होता. सामना संपल्यानंतर जेव्हा दोन्ही संघ हस्तांदोलन करत होते तेव्हा सचिन तेंडुलकर काही वेळ शुभमन गिलशी बोलला. त्याने गिलच्या कानात काहीतरी सांगितले. याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

सचिनने शुभमन गिलचे कौतुक करणारे ट्विटही केले होते. आरसीबीविरुद्ध गिलने शतक झळकावल्याने मुंबई इंडियन्सचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचला होता. आता पुन्हा एकदा समोरून त्याच्या शतकी कामगिरीनंतर शुभमन गिलचे कौतुक केले आहे.
शुभमन गिलची आयपीएल २०२३ मध्ये तीन शतके आहेत. ही तिन्ही शतके गेल्या ४ सामन्यांमध्ये झाली आहेत. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध पहिले शतक झळकावल्यानंतर गिलने पुढच्याच सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरविरुद्ध शतक झळकावले.

एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो मुंबई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here