चावी बनविणाऱ्याची हातसफाई ; धडगाव येथुन १ लाखाचा नेकलेस चोरला

0
370

नंदुरबार : कपाटाच्या लॉकरची चावी बनवित घरातील लोकांचे लक्ष नसल्याचा फायदा घेत एक लाख रुपये किंमतीचा सोन्याचा नेकलेस चोरुन नेल्याची घटना धडगाव शहरातील शिक्षक कॉलनीत घडली आहे. याप्रकरणी संशयित इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

ADVERTISEMENT

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धडगाव शहरातील शिक्षक कॉलनीत कुसूम जात्र्या पाडवी या राहतात. त्यांच्या घरातील कपाटाचे लॉकर नादुरुस्त झाल्याने त्यांनी चावी बनविणाऱ्यास बोलावले होते. सादर इसम कपाटाच्या लॉकरची चावी बनवित असतांना कुसूस पाडवी व त्यांची मुलगी या किचनमध्ये गेल्या. त्यांचे लक्ष नसल्याचा फायदा घेत चावी बनविणाऱ्या अनोळखी इसमाने कपाटाच्या लॉकरमधून १ लाख १ हजार ४०० रुपये किंमतीचा १७ ग्रॅम ९० मि.ली.वजनाचा सोन्याचा नेकलेस चोरुन नेला.

SPONSORED CONTENT

याबाबत कुसूम पाडवी यांच्या फिर्यादीवरुन धडगाव पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.शशिकांत वसईकर करीत आहेत.

एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो, नंदुरबार

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here