सद्या गाजत असलेला “द केरला स्टोरी’ हाक चित्रपट नंदुरबारच्या अमर सिनेमागृहात सुरु आहे. आज सायंकाळी नंदुरबारच्या खासदार डॉ. हिना गावित, नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित व जि.प. च्या माजी अध्यक्षा डॉ. कुमुदिनीताई गावित यांनी महिला व मुलीसमवेत बसून चित्रपट पाहिला. भाजपा युवा मोर्चातर्फे शहर व ग्रामीण भागातील महिला व मुलींसाठी मोफत शो चे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान चित्रपट पाहायला आलेल्या खासदार डॉ.हिना गावित व डॉ.सुप्रिया गावित यांच्यावर भाजपा युवा मोर्चातर्फे पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत करण्यात आले.
भारतातील तरुणींचे होणारे शोषण, मानसिक छळ, खोटे प्रेमातून होणारी फसवणूक याचे विविध पैलू मांडणारा “द केरला स्टोरी’ हा चित्रपट नुकताच पूर्ण भारतात प्रदर्शित करण्यात आला आहे. याला संपूर्ण भारतातून विशेष पसंती दिली जात असून चित्रपट पाहण्यासाठी विशेषतः महिला व मुलींची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.
तर महिला व मुलींमध्ये जनजागृती निर्माण व्हावी यासाठी काही संघटना, पक्ष यांच्यातर्फे महिला व मुलींसाठी मोफत शो चे आयोजन करण्यात येत आहे. नंदुरबारात माळी प्रतिष्ठाण व भाजपा युवा मोर्चातर्फे वेगवेगळे शोचे आयोजन करण्यात आले आहे. आज सायंकाळी ७ वाजता भाजपा युवा मोर्चातर्फे मिलिंद मोहिते व त्यांच्या सहकाऱयांनी शो आयोजित केला. यावेळी नगरसेवक चारुदत्त कळवणकर, प्रशांत चौधरी आदी उपस्थित होते.
या शोला खासदार हिना गावित, जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित, माजी अध्यक्षा डॉ.कुमुदिनीताई गावित यांना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी प्रवेशद्वारावर डॉ.हिना गावित व डॉ. सुप्रिया गावित यांच्यावर पुष्पवृष्टी करीत त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी खासदार डॉ. हिना गावित यांनी तरुणींसोबत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी सिनेमागृहात महिला व तरुणींसमवेत संपूर्ण चित्रपट पाहिला.
एम.डी.टी.व्ही. न्युज नंदुरबार