नाशिक :२२/३/२३
मराठी नववर्ष अर्थात चैत्र पाडवा यंदा 22 मार्च रोजी साजरा केला गेला..
संपूर्ण राज्यभरात शोभायात्रा, मिरवणूक, ढोल ताशांचा गजर कानी ऐकू येत होता..
का तालावर थिरकल्या तरुणी ,महिला, शाळकरी विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक सुद्धा..
नाशिक म्हणजे पावन पवित्र भूमी.. नाशिक नगरीला देखील लाभलंय सांस्कृतिक वारसा..
नाशिकचा हा सांस्कृतिक गुढीपाडवा उत्सव सर्वांसाठी पर्वणी ठरला..
मराठी नववर्षाची सुरुवात गुढीपाडवा हा सण साजरा करून केली जाते…
चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस मराठी नववर्षाचा पहिला दिवस मानला जातो… या दिवशी सर्वत्र घरावर गुढी उभारून हा आनंदाचा दिवस साजरा होतो…
यानिमित्ताने नाशिक मध्ये सकाळी साडेसहा वाजेपासून ठिकठिकाणी विविध चौकातून विविध भागातून नववर्ष स्वागत यात्रा समिती च्या माध्यमातून शोभायात्रांनी नाशिककरांचं लक्ष वेधलं…
नरसिंह नगर मधून निघालेल्या शोभायात्रेत हातात भगवा ध्वज घेऊन योगेश बक्षी यांनी हे लक्षवेधी प्रात्यक्षिक केलं.
ढोल ताशा पथक यांच्यासह गाड्यांवर भगवेध्वजांचं सजावट करून पारंपारिक वेशभूषा मध्ये महिलांनी सहभाग नोंदवला… नरसिंह नगर मध्ये हा उत्साह तेवढाच पहावयास मिळाला…
गुढीपाडव्या संदर्भात माहिती देत आहेत नरसिंह नगर मधील नस्ती उठाठेव संस्थेचे प्रमुख श्रीयुत बापू कोतवाल.. ऐकूया काय म्हणालेत..
तर एका चिमुकल्या विद्यार्थिनींने पारंपारिक वेशभूषा करून या शोभायात्रेत सहभाग घेऊन कौतुकास पात्र ठरली.. ऐकूया कुमारी सान्वी सोनवणे हिची मुक्त प्रतिक्रिया..
तर पी एन टी कॉलनी या परिसरात तेथील नागरिकांनी महिलांनी जोश पूर्ण उत्साहात लेझीमच्या तालावर ठेका धरला.. श्रीयुत कवीश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांनी दिल खेचक लेझीम सादरीकरण केलं..
कायम चूल आणि मूल या झोखडातून मुक्त होत स्वतःचा सांस्कृतिक कलाविष्कार सादर करण्याची त्यांना संधी मिळाली… तर विविध ठिकाणाहून निघालेल्या स्वागतयात्रा शोभायात्रांचा समारोप कॉलेज रोड परिसरात झाला..
ज्या ठिकाणी विविध स्वागत समित्या एकत्र आल्या.. या ठिकाणी शाळकरी विद्यार्थ्यांनी देखील लेझीम नृत्य सादर केलं..
नाशिक मराठा विद्या प्रसारक समाज चे सरचिटणीस एडवोकेट नितीन ठाकरे यांची प्रतिक्रिया यावेळी जाणून घेतली .. ऐकूया नेमकं ऍडव्होकेट ठाकरे काय म्हणालेत..
नाशिकचा हा सांस्कृतिक गुढीपाडवा महोत्सव एक ऐतिहासिक पर्वणीच ठरावा…
न भूतो न भविष्यती अशी ही शोभायात्रा नाशिक साठी होती…
मराठी नववर्षाच्या निमित्ताने नवे संकल्प करून नव्या वर्षाला सुरुवात केली जाते..
त्याचाच हा एक भाग म्हणून गुढी उभारून विजयाचा आणि समृद्धीचे प्रतीक मानलं जातं..
या संपूर्ण शोभायात्रेचा आढावा घेतलाय नाशिकहून तेजस पुराणिक जिल्हा प्रतिनिधी नाशिक यांनी.. ऐकूया
नाशिककरांनी भरभरून प्रतिसाद या शोभायात्रांमध्ये दिल्याचं पहावयास मिळालं…
तेजस पुराणिक, जिल्हा प्रतिनिधी,एम.डी.टी.व्ही न्यूज नाशिक