म्हसावद (ता.शहादा)
तालुक्यातील बहिरपूर, मुबारकपूर, खरगोन, बिलाडी या गावातील सरपंच, पोलीस पाटील, ग्रामस्थ व बचत गटातील महिलांनी काही दिवसांपूर्वीच गाव शिवार परिसरातील अवैध दारू विक्री करणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात मोर्चा काढला होता.
त्या अनुषंगाने म्हसावद पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांनी सरपंच, पोलीस पाटील, ग्रामस्थ यांच्या समवेत बहिरपूर येथे सभा घेतली.
परिसरातील नागरिकांचा व ग्रामस्थांचा या सभेला चांगला प्रतिसाद मिळाला. पोलीस निरीक्षक श्री.पवार यांनी गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या व मार्गदर्शन केले.
विश्वास खेडकर यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, काही समाजकंटक आम्ही पोलिसांना हप्ता देतोय, आम्हाला कुठल्या ही प्रकारचा भय नाही, असे सांगतात. यामुळे पोलीसांवरील विश्वास कमी होत चालल्याचे सांगून या समाजकंटकांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन द्यावे असे सांगितले.
पोलीस निरीक्षक पवार यांनी यावेळी गावकऱ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, जर कोणी आसपासच्या शिवारात किंवा गावात दारु विक्री करत असेल तर त्यांना आधी प्रेमाने सांगा. ऐकले नाही तर पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, सदस्य यांना माहिती द्या, तरी देखील असे प्रकार होत राहिले तर पोलिसांना माहिती द्या. पोलीस अर्ध्या रात्री येऊन समाजकंटक व अवैध प्रकारे दारु विक्री करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करतील, असे आश्वासन दिले.
निलेश अहेर… एम.डी. टी.व्ही. न्युज… म्हसावद (ता. शहादा)