नंदुरबार : १२ फेब्रुवारी २०२३
सुरत-भुसावळ लोहमार्गावर पाळधी येथे सुरत-भुसावल पॅसेजर मध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवुन घटना घडली होती.
नंदुरबार ते भुसावळ दरम्यान जळगाव जिल्ह्यातील पाळधी येथे ८ जानेवारी रोजी प्रकाश वामन पाटील रा. वेलसवाडी, ता. जळगांव व विलास संपत जंगले रा. मालदाभाडी ता.जामनेर हे सुरत भुसावल पॅसेजरने प्रवास करीत असतांना पाच जणांनी दोघांना चाकूचा धाक दाखवत तारहाण करीत प्रवाश्यांकडून १७ हजार रोख रक्कम, आधार कार्ड, पॅन कार्ड हिसकावून घेत फरार झाले होते.
त्यानंतर नंदुरबार लोहमार्ग पोलीस ठाण्यात याबाबत अज्ञात व्यक्तीविरुद्ध प्रकाश वामन पाटील यांच्या फिर्यादीवरून लोहमार्ग पोलीस स्टेशन नंदुरबार येथे भादवी कलम ३९५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्या अनुषंगाने रेल्वे पोलीस प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार लोहमार्ग पोलिसांचे पथक तयार करण्यात आले होते.
लोहमार्ग पोलीस पथकाने आरोपींचा शोध घेत टोळीतील जुबेर उर्फ डबल शेख भिकन रा. गेदालाल मिल जळगाव, तन्वीर उर्फ तन्नु रहीम शेख रा. शिवाजी नगर जळगाव, फारूख शाह नुरमोहम्मद फकीर रा. दुध फेडरेशन, जळगाव या तीन संशयीत आरोपींताना अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून १७ हजाराची रोख रक्कम हस्तगत केले आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक लोहमार्ग औरंगाबाद गणेश शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी, दिपक काजवे लोहमार्ग मनमाड यांच्या मार्गदर्शनाखाली अन्वेशन अधिकारी पोलीस सपोनि रमेश वावरे, जयकुमार कोळी , किरण बोरसे, नितीन पाटील , संजय पाटील ,राजेश गोराडे, जितेंद्र चौघरा तसेच रेल्वे सुरक्षा बल पोस्ट अमळनेर येथील निरीक्षक कुमार श्रीकेश,कुलभूषण सिंह चौहाण, नंदू पाटील, सुभाषसिंह,सीआयबी सुरत यांनी केली.
प्रवीण चव्हाणसह निलेश अहेर,एम डी टी व्ही न्यूज प्रतिनिधी,नंदुरबार