अकोला -३१/७/ २३
बोरगाव वैराळे ग्रामपंचायतने रोजगार हमी योजनेतून फळझाडे व इतर असे एकूण एक हजार वृक्ष लावून ती जगविण्याचा ग्रामपंचायतचा संकल्प इतरासाठी प्रेरणादायी ठरेल असे प्रतिपादन उरळचे ठाणेदार गोपाल ढोले यांनी केले
बोरगाव वैराळे ग्रामपंचायत मागील तीन वर्षापासून विविध सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक उपक्रम राबवून गावात सामाजिक बांधिलकी जोपासत असून मागील दोन वर्षापासून गावात विविध विकासात्मक कामे राबविण्यासोबत पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड करण्यावर भर देत असून ग्रामपंचायत चे प्रत्येक उपक्रम हे इतरांना भविष्यात प्रेरणादायी ठरणार आहेत असे मत ठाणेदार ढोले यांनी यावेळी व्यक्त केले याप्रसंगी बाळापुर चे माजी आ बळीराम सिरस्कार यांनी मागील दहा वर्षापासून राजेश्वर वैराळे, विनायक वैराळे, विठ्ठल वैराळे, सुनील गावंडे यांनी अनेक गावविकासासोबत सामाजिक उपक्रम राबविले असून गावातील विकासावर भर देऊन कामे केली असल्याने गावकऱ्यांनी अशा सामाजिक काम करणाऱ्या लोकांना साथ दिल्याने गावाचा कायापालट होत असल्याचे मत मांडले.
WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
या कार्यक्रमाला सरपंच कल्पना विनायक वैराळे, उपसरपंच राजेश्वर वैराळे, तंटामुक्त समिती अध्यक्ष विठ्ठलराव वैराळे, सुनील गावंडे, श्रीराम वेते,पांडुरंग बाहकर, प्रदीप वाकोडे, दिलीप इंगळे, राजेश वैराळे, वर्षा वैराळे, पुरूषोत्तम शेळके, मंगेश वैराळे, दत्ता सुरतकार, हरिभाऊ वैराळे, रामदास थारकर, सदाशिव गावंडे, बळीराम वैराळे, योगेश ढोरे, संतोष वडतकार, बिट जमादार मुळे,सचिन जाणे,रामा घाटे,शुभम गावंडे, शरद बोचे,अक्षय काळे,लोचन मानकर,बालु मानकर, वनमाला बोक्से, इंदू सुर्यवंशी, बाळू काळे आदीसह बहुसंख्य गावकरी उपस्थित होते
प्रतिनिधी, अशोक भाकरे,एम डी टी व्ही न्यूज , अकोला