घोषणाबाज सरकारने शेतकऱ्यांची निराशा केली… दोंडाईचा येथील मेळाव्यात अजित पवार यांचा घणाघात

0
318

शिंदखेडा :- राज्यात शेतकरी समाधानी नाही, कांदा, कपाशीला भाव नाही. शरद पवार मुख्यमंत्री असताना कांदा निर्यात होत होता, परिणामी भाव मिळत होता. शेतकऱ्यांना वीज नाही, वा वीज माफ नाही. महाराष्ट्राचे सरकार केवळ घोषणाबाजी करणारे आहे, असा घाणाघात विरोधी पक्षनेते अजित दादा पवार यांनी दोंडाईचा येथे शेतकरी मेळाव्यात केला.

धुळे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर भामरे यांच्यासोबत समाजवादी पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष विजयसिंग राजपूत, साहेबराव खरकार, सुयोग भदाणे, सागर मराठे, नंदु सोनवणे, देविदास कोळी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. दोंडाईचा येथील केशरानंद गार्डनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशासाठी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

5a7839c9 cc4f 41d9 b722 b65f9774415f

याप्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित दादा पवार, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी राज्यमंत्री डॉ.हेमंत देखमुख, विधानसभा माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, प्रदेश उपाध्यक्ष अनिल आण्णा गोटे, पक्षनिरीक्षक अर्जुन टिळे, आमदार अनिल पाटील, माजी आमदार रामकृष्ण पाटील, जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे, पुजा खडसे, डॉ.रविंद्र देशमुख, जुई देशमुख पाटील, ज्योती पावरा, किरण शिंदे, बापू महाजन, महेंद्र पाटील, रणजित राजे भोसले, पोपटराव सोनवणे, अमित पाटील, जि.प.सदस्य ललित वारुडे, नाना मराठे, ग्रंथालय सेलचे दिपक जगताप, शिंदखेडा शहराध्यक्ष प्रविण पाटील, ॲड.निलेश देसले आदी पदाधिकारी व्यसपीठावर उपस्थित होते.

हे सुध्दा वाचा

“बिपरजाॅय”… नंदुरबारला धोका नाही …! – MDTV NEWS

फोन पे, गुगल पे, पेटीएम वापरत असाल तर … – MDTV NEWS

मंत्रिमंडळ निर्णय : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी १५०० कोटी रुपयांस मंजुरी – MDTV NEW

यावेळी ज्ञानेश्वर भामरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व शेतकऱ्यांच्या वतीने बैलगाडीची प्रतिकृती देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, सरकार गद्दार असुन कोणतेही ठोस निर्णय घेत नाही. कापसासोबत कांद्याला भाव नाही. तो भाव मिळेल अशी अपेक्षा होती पण ती फोल ठरली आहे. प्रकाशा, बुराई प्रकल्प पूर्ण झाला नाही, म्हणून शेताला पाणी नाही. शेतकऱ्यांच्या शेतावर रस्ते नाही.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

ज्ञानेश्वर भामरे हे शेतकऱ्यांचा शिवारामध्ये पाणी आणण्यासाठी प्रयत्नशिल आहेत. ज्ञानेश्वर भामरे यांची राष्ट्रवादीत घरवापसी झाली आहे.आगामी काळात राष्ट्रवादीचा आमदार करण्यासाठी पाडापाडीचे राजकारण करू नका. कोणालाही माफ केले जाणार नाही, असे अजित पवार यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे कान टोचले. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारीनी मतदारसंघात गावागावात बुथ बांधणी काम हाती घेऊन घराघरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पोहचवा, असे आवाहन केले.

हे सुध्दा वाचा

“बिपरजाॅय”… नंदुरबारला धोका नाही …! – MDTV NEWS

फोन पे, गुगल पे, पेटीएम वापरत असाल तर … – MDTV NEWS

मंत्रिमंडळ निर्णय : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी १५०० कोटी रुपयांस मंजुरी – MDTV NEW

ज्ञानेश्वर भामरे म्हणाले कि, माझी घरवापसी झाली असुन राष्ट्रवादीसोबत काम करणार आहे. शिंदखेडा मतदार संघात १६३ गावात येत्या आठ दिवसात गावागावात जनजागर यात्रा काढणार आहे. माझे जि.प.चारही गटात स्वतःच एक मत नसताना देखील विविध पक्षाच्या टिकिटावर जनतेने निवडुन दिले. सर्वसामान्य जनतेच्या, शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या मुद्द्यावर शासन दरबारी लढा सुरू राहील. केशरानंद उद्योग समूहातुन किमान पंचवीस टक्के हिस्सा गोरगरीब जनतेची सेवा, मदतीला वापरत असतो. आमदार रावलांनी फॅक्टरीतुन एक कवडी देखील मदत केली नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी सत्तेचा गैरवापर करत मतदारसंघात जातीपातीच्या राजकारणातुन लढाई लावायचे काम रावलांनी केल्याचा आरोप ज्ञानेश्वर भामरे यांनी केला.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री डॉ हेमंत देखमुख, जुई पाटील, जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. शिंदखेडा मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्तेसह हजारोच्या संख्येने शेतकरी व महिला उपस्थित होते. मेळावा यशस्वीतेसाठी शहराध्यक्ष प्रवीण पाटील, निलेश देसले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यानी परिश्रम घेतले.

यादवराव सावंत. एमडी.टीव्ही. न्युज शिंदखेडा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here