बेशिस्त वाहनचालकांवर उगारला वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा ..

0
257

तलासरी ,पालघर :१/०३/२०२३

तलासरी पोलिसांनी वाहन तपासणी मोहीम सुरू केली .
अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करून दंड वसूल केला जात आहे.
१८ वर्षाखालील मुलांकडे वाहन चालविण्याचा परवाना नसतानाही मुले भरधाव वेगात वाहने चालवितात.
तलासरी तालुक्यातील काही प्रवाशी वाहने क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करतात.

6
01


यामुळे प्रवाशांच्या जीवास धोका आहे.
तसेच काही चालकांकडे वाहन परवाना नाही.
तर काही चालक दारू पिऊन वाहने चालवितात.
यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

7
02


याबाबतच्या तक्रारी पोलिसांकडे करायला कोणी तयार नाही ..
मात्र हि गंभीर बाब असून याप्रमाणे वाहतूक नियम न पाळणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी म्हणून पोलिसांनी मोहीम राबवली .
ही बाब लक्षात घेऊन तलासरी पोलिसांनी वाहन तपासणी मोहीम हाती घेतली .
शहरात विना परवाना दुचाकीवरून ‘ट्रिपल सीट’ फिरणाऱ्या वाहनधारकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.

हे हि पहा

त्यामुळे तलासरी याठिकाणी कॉलेजच्या मुलांनी विना परवाना वाहने शहरात चालवू नये,शहरातील पालकांनी आपल्या लहान मुलांना वाहन देऊ नये व सर्व वाहन धारकांनी वाहतूक नियमांचे पालन करत वाहने चालवावी असे आव्हान तलासरी पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक अजय वसावे यांनी केले .
अन्यथा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
तलासरी शहरातील तलासरी-उधवा,तलासरि ,संजाण ,आमंगाव, उपळाट ,कोचाई रस्त्यावर विना हेल्मेट , विनापरवाना ट्रिपल सीट बसून दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यात आली .
याबाबत तक्रारीनंतर तलासरी तालुक्यातील रस्त्यावर स्थानिक पोलिसांनी धडाकेबाज मोहीम राबवून २९० दुचाकी वाहनांना तलासरी पोलीस ठाण्याचा रस्ता दाखवला .
त्यांच्या कडून मोटार वाहन कायद्यानुसार १ लाख ५० हजार रुपये दंड वसूल केला .
ऋषिकेश जाधव पालघर प्रतिनिधी एम डी टी व्ही न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here