म्हातारपणात आईचा आधार गेला; घटनेने बोरद परिसर शोकसागरात बुडाला
नंदुरबार :- घरात लग्नकार्य असल्याने सर्वत्र आनंद आणि उत्साहाचे वातावरण… घराला रंगरंगोटी, सजावट झाली… लग्न पत्रिकांचे वाटप झाले, लग्न तीन दिवसांवर असल्याने नातेवाईकही दाखल होत लगीनघाई सुरु होती… पत्रिका वाटताना माझ्या लग्नाला अवश्य या ह ! असा आग्रही असलेल्या किसनच्या अंत्ययात्रेत गावकऱ्याना, नातलगांना जावे लागल्याची मन सुन्न करणारी घटना बोरद गावात काल शुक्रवारी घडली. तीन बहिणींचा भाऊ… म्हातारपणात आईचा आधार निघून गेल्याच्या या घटनेने संपूर्ण बोरद परिसर हळहळला आणि शोकसागरात बुडाला.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
तळोदा तालुक्यातील बोरद येथील किसन राजाराम शिरसाठ हा व्यवसायाने इलेक्ट्रिशियन असल्याने गुजरात राज्यात कामे करून वृद्ध आईचा आधार होता. वडिलांचे ५ वर्षांपूर्वी निधन झाल्याने तो घरचा कर्ता मुलगा होता. किसन याचा २८ मे रोजी विवाह नियोजित होता. यामुळे घरात लग्नाची तयारी पूर्ण करण्यात आली होती. शुभकार्य असल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण होते.
किसनचा विवाह नरडाणा येथील मुलीशी होणार होता. सर्वांना लग्न सोहळ्याची आतुरता लागली होती. घरात लगबग सुरु होती. लग्नाचा बस्ता, मंडप, वाजंत्री जेवणाची व्यवस्था पूर्ण झाली होती. २७ मे रोजी हळद समारंभ होणार होता. शिरसाठ कुटुंबीयांचा आनंद गगनात मावत नव्हता. पण, हळदीच्या दोन दिवसाआधीच अघटीत घडले आणि शिरसाठ परिवाराचे स्वप्नांवर पाणी फेरले. गुरुवारी दि.२५ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घरातील बाथरूम मधील विद्युत बोर्डमध्ये बिघाड झाला. ते दुरुस्ती करत असताना अचानक किसनला वीजेचा तीव्र धक्का लागला. यात किसन शिरसाठ याचा जागीच मृत्यू झाला.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
किसन हा म्हाताऱ्या आईचा व तीन बहिणींचा एकुलता एक आधार होता. यामुळे कुटूंबाची मदार किसनवर होती. आता भावी आयुष्याची स्वप्ने रंगवत असतांनाच नियतीने घात केला अन् साऱ्या स्वप्नांवर पाणी फेरले. ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली आणि त्याच्या नातलागवर तसेच गावावर दुःखाचा डोंगर कोसळला. बोरद देखील देविदास गोपाळ शिरसाठ यांचा पुतण्या व कै. राजाराम गोपाळ शिरसाठ यांचा किसन हा होत. त्याच्या दुर्दैवी निधनाने संपूर्ण बोरद गावाट बंद पाळण्यात आला. त्याच्या पश्चात आई, काका, काकू, ३ बहिणी, मेव्हणे असा परिवार आहे.
एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो, नंदुरबार