रेल्वेच्या धडकेत तिघांचा मृत्यू..
विरार रेल्वे स्थानकात एक भीषण अपघात झाला आहे..
रेल्वे रुळ ओलांडताना रेल्वेने धडक दिल्याने पती पत्नीसह तीन महिन्याच्या बाळाचा जागीच मृत्यू झाला आहे.
एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर जाताना, रेल्वे रुळ ओलांडतेवेळी वेगाने आलेल्या मेलने धडक दिल्याने हा अपघात घडला असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे.
मृतांची ओळख अजून पटली नसून पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेने काही काळ परिसर सुन्न झाला होता.


