कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी काही संपता संपेना…

0
249

साक्री:१४/२/२३

  • शॉर्ट हेडलाईन
  • 1 कापूस उत्पादक शेतकरी झालाय हताश..
  • 2 शेतकऱ्यांना मिळावी त्वरित मदत आम आदमी शेतकरी संघटनेची मागणी

कापूस उत्पादक शेतकऱ्यांना तारण योजनेतून पैसा उपलब्ध करून द्यावा अशा आशयाचं निवेदन नुकतच शेतकरी संघटनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलंय..

गेल्या काही महिन्यांपासून कापूस उत्पादक शेतकरी विवंचनेत आहे. कापसाला योग्य हमीभाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झालीये. वारंवार प्रशासनाकडे तगादा लावून देखील प्रशासनाकडून केराची टोपली दाखवली जाते. शासनाने मदतीचा हात देऊन तारण योजनेतून पैसा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आम आदमी शेतकरी संघटनेनं केलीये. या संदर्भातलं निवेदन ईमेल द्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नुकतच पाठवले.

मागील वर्षी कापसाला 12 ते 13 हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत होता. मात्र अतिवृष्टी झाल्याने कापसाचं नुकसान झालं. त्याच भावना कापूस विक्री होईल या आशेने शेतकरी सुखावला होता. झालेल्या नुकसानीतून हाती आलेल्या कापसातून उडी उभरून निघेल या आशेवर 70 ते 80 टक्के कापूस उत्पादक शेतकरी यांनी आपला कापूस अद्यापही विकलेला नाही.

त्यामुळे लवकरात लवकर मदत मिळावी ही मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते. मात्र संबंधित कृषी विभाग आणि प्रशासनाकडून कुठल्याही हालचाली होताना दिसत नसल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक विवंचनेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारनं आणि संबंधित विभागाने, प्रशासनाने याची दखल न घेतल्यास आंदोलनाचा तीव्र इशारा आम आदमी शेतकरी संघटनेनं दिलाय.

साक्रीहून राहुल नांद्रे एम.डी.टी.व्ही न्यूज प्रतिनिधी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here