भडगाव -4/6/23
” उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी,
नजरेत सदा नवी दिशा असावी,
घरट्याचे काय आहे बांधता येईल केव्हाही,
क्षितिजांच्याही पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी..
खऱ्या अर्थाने ही उक्ती सार्थ केली भडगाव येथील आदर्श कन्या विद्यालयातील या जुळ्या बहिणींनी..
आजचा काळ हा स्पर्धेचा आणि स्पर्धेच्या युगात टिकण्याचा..
इयत्ता दहावी आणि अगदी पाचवीपासून देखील पालक आपल्या मुलांना क्लासेसला लावतात
क्लासला गेला म्हणजे अभ्यास होतो आणि यश मिळतं ही खोटी आणि भ्रामक संकल्पना सध्याच्या पालकांमध्ये रूढ आहे..
परंतु या संकल्पनेला फाटा देत उत्तम गुण संपादन करून या बहिणींनी चांगलाच चपराक दिलाय..
यशाला गवसणी घालण्यासाठी स्वयंअध्ययन आणि सेल्फ स्टडीचा उत्तम पर्याय निवडून ग्रामीण भागात इयत्ता दहावीच्या माध्यमिक शालांत परीक्षेत घवघवीत यश संपादित केलं
या आहेत कुमारी भूमी मोहन सोनार आणि कुमारी भक्ती मोहन सोनार
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
कुमारी भूमी इला मिळाले दहावीच्या परीक्षेत 95.40% तर कुमारी भक्ती हिला मिळाले 91%..
ग्रामीण भाग म्हटला की कॉपीचा सर्रास पाऊस पडतो.. परंतु याचा कुठलाही लवलेश त्यांच्या यशात दिसत नाही.. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि स्वतःचे स्व प्रयत्न आणि चिकाटी यांच्या बळावर या दोघींनी मिळवलेलं यश खरोखर कौतुकास्पदच म्हणावे लागेल
मुळातच हुशार असल्यामुळे इयत्ता दहावीच्या परीक्षेत मिळवलेले मार्क येणाऱ्या दहावीच्या मुला मुलींसाठी आदर्श ठरावेत असेच
टोणगाव जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतून त्यांनी चौथीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलं
जुळ्या बहिणी असल्या तरी त्यांची आवड- निवड मात्र सारखीच
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
त्यांचे वडील मोहन सोनार सुवर्णकार समाजाचे कार्यकर्ते असून ते देखील पत्रकार आहेत
त्यांच्या या यशाबद्दल शाळेचे प्राचार्य सुरेश रोकडे यांच्यासह विषय शिक्षकांनी घरी जाऊन या विद्यार्थिनींचा सन्मान केला
पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
खरोखर एमडीटीव्ही न्यूज परिवाराला देखील या दोघींचं सार्थ अभिमान आहे
कोणतेही क्लास व ट्युशन न लावता आपण यशाला गवसणी घालू शकतो हे त्यांनी सिद्ध केलं..
मनात असावी लागते ती यशाला गवसणी घालण्याची मनात जिद्द..
त्यांच्या यशाचं गमक म्हणजे स्वकष्टाचे मार्क आणि स्वकष्टाची मेहनत..
एम डी टी व्ही परिवाराकडून या दोघींना पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा आणि यशासाठी मनःपूर्वक अभिनंदन
सतीश पाटील, भडगाव प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज, जळगाव