विसरवाडीत चोरट्यांचा धुमाकूळ… एकाच रात्री फोडली तीन घरे; लाखोंचा ऐवज चोरीला

0
475

विसरवाडीत चोरटयांनी धुमाकूळ घातल्याने नागरिकानमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण जाली आहे. दि.१९ जुन सोमवारी मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास भरवस्तीत एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोड्या करून चोरटे दागिन्यासह रोख रक्कम घेऊन पसार झाले.

विसरवाडी येथील शनिमंदीर परिसरातील कॉलनीत राहणारे शिक्षक एन.व्हि.वाघ हे दोन दिवस बाहेरगावी गेल्याने घराला कुलूप असल्याचा फायदा घेत चोरटयांनी कडीकोंडा तोडून घरात प्रवेश केल्याचे दिसून आले. चोरटयांनी घरातील तीन ते चार लाकडी व लोखंडी कपाटे, तिजोरी फोडुन रोख रक्कम व दागिने लंपास केले.

हे सुध्दा वाचा

Good News… राज्यातील सर्व आश्रमशाळांना मिळणार वॉशिंग मशिन | MDTV NEWS

ACB Trap … नंदुरबार पं.स.चे विस्तार अधिकरी जाळ्यात ! | MDTV NEWS

नंदुरबार : पोलीस दलातील पाच अधिकाऱ्यांची बदली… | MDTV NEWS

म्हसावद पोलिसांनी रोखला पिप्राणी येथील बालविवाह ! | MDTV NE

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

8d035328 3ed7 4b41 ae6a ed5f2396504d

तसेच ग्रामपंचायत परिसरात मागील गल्लीत राहणारे व्यवसायिक अनिल चौधरी यांच्या घरी कुलूप असल्याचा फायदा घेत चोरटयांनी घरातील दोन कपाटातील सामान अस्तव्यस्त करून तिजोरीत असलेले सुनेचे सोन्याचे दागिने तसेच जुन्या व विशेष नंबर असलेल्या नोटांचा संग्रह करून ठेवलेली हजारोंच्या नोटा अशी काही हजारोंची रक्कम चोरून नेली. ग्रामपंचायत पुढच्या गल्ली राहणारे शिक्षक नरेंद्र पगारे हे कुटुंबीयांसमवेत घराच्या वरच्या मजल्यावर झोपलेले असताना चोरट्यांनी कुलूप तोडून घरातील दोन कपाटे व सामान अस्ताव्यस्त करुन हजारोंची रोख रक्कम लंपास केली आहे.

हे सुध्दा वाचा

Good News… राज्यातील सर्व आश्रमशाळांना मिळणार वॉशिंग मशिन | MDTV NEWS

ACB Trap … नंदुरबार पं.स.चे विस्तार अधिकरी जाळ्यात ! | MDTV NEWS

नंदुरबार : पोलीस दलातील पाच अधिकाऱ्यांची बदली… | MDTV NEWS

म्हसावद पोलिसांनी रोखला पिप्राणी येथील बालविवाह ! | MDTV NE

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

घटनेची माहिती मिळताच विसरवाडी पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भूषण बैसाणे हे पोलिस पथकासह दाखल झाले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. ग्रामीण भागात एकाच रात्री तीन घरफोड्या झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांनी रात्र गस्त वाढवणे गरजेचे असल्याच्या प्रतिक्रिया या भागातील नागरिकांनी व्यक्त केल्या. दरम्यान, चोरटयांचा लवकरच शोध घेण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

एमडी.टीव्ही. न्युज ब्युरो, नंदुरबार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here