धुळे :१५/२/२०२३
- शॉर्ट हेडलाईन
- 1… व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी विद्यार्थ्यांनी व्यक्त केलं मातापित्यांप्रती प्रेम
- 2 ऑर्किड स्कूलमध्ये राबवला हा उपक्रम
एकीकडे समाजात पाश्चिमात्य संस्कृतीचं अंधानूकरण होत असताना भारतीय संस्कृती कशी श्रेष्ठ आहे याची प्रचिती आली धुळ्यातील ऑर्किड स्कूलमध्ये…
14 फेब्रुवारी 2019 ला पुलवामात झाला होता भारतीय जवानांच्या बसवर हल्ला.. तर दुसरीकडे भारतीय तरुण मग्न होते व्हॅलेंटाईन डे सारखा दिवस साजरा करण्यात, आपण गमावलेत 40 जवान.. त्या दिवसापासून हा दिवस भारतीय साजरा करतात काळा दिवस..
व्हॅलेंटाईन डे एका अनोख्या पद्धतीने या शाळेनं राबवून प्रेम केवळ प्रियकर प्रेयसीचं नसून आपल्या घरातील कुटुंबातील सदस्यांप्रती देखील आपण व्यक्त करू शकतो हे दाखवून दिलं.. मातृ पितृ पूजन कार्यक्रमात पालकांनी सहभाग घेतला. भारतीय संस्कृतीत आई-वडिलांचे असलेले स्थान विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच कळावं.. हा त्यामागील उद्देश होता.
शाळेची विद्यार्थिनी श्रेया व श्रद्धा यांचे पालक श्रीयुत भदाणे व सौ भदाणे विद्यार्थी नीरज याचे पालक श्री व सौ श्रीवास्तव या माता-पित्यांचे पूजन करून त्यांचे आशीर्वाद घेण्यात आले.. पाहू या अनोखा उपक्रम…
शाळेचे चेअरमन इंजिनीयर मनोज देसले यांनी याविषयी मनोगत व्यक्त केलं. या अनोख्या उपक्रमाचे पालकांनी कौतुक केलं..
दिलीप साळुंखे एमडी टीव्ही न्यूज प्रतिनिधी, धुळे