शहादा : १४/३/२३
शहादा तालुक्यात आहे टूकी नावाचं गाव 70% आदिवासी लोकवस्तीत असलेले हे गाव आहे या विधवा महिलेची ही कैफियत..
सदर गावातली ग्रामपंचायत या विधवा महिलेवर अन्याय करत असल्याने तिने शहादा पंचायत समिती गाठली.. गटविकास अधिकाऱ्यांना त्याबाबत निवेदन दिल..
ग्रामपंचायत मध्ये गेल्या पंधरा वर्षापासून ग्रामपंचायत शिपाई गणेश पवार हा गावाला पाणीपुरवठा न सोडण्याचा आणि इतर कामे करायचा..
13 मार्च 2022 रोजी गणेश पवार चा मृत्यू झाला आणि त्याच्या मृत्यूनंतर त्याचा कुटुंब आणि त्याचा संसार उघड्यावर पडला..
त्याच्या शिपायाच्या जागी पत्नीने दावा केला की मला शिपाई म्हणून ग्रामपंचायत मध्ये लावा मात्र सरपंचांनी मनमानी कारभार करून विधवा महिलेवर दमदाटी करायला सुरुवात केली..
नोकरी देण्यात दूरच पण मी या गावचा सरपंच मी ठरवणार कोणाला शिपाई बनवायचं सरपंचांच्या अशा मनमानी वागण्याने विधवा महिला आणि तिची मुलगी खचून गेली…
एकीकडे 08 मार्च जागतिक महिला दिन साजरा झाला त्या दिवशी स्त्रियांचा सन्मान केला मात्र ग्रामीण भागातल्या या महिलेची ही दारुण अवस्था..
अखेर तिने शहादा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदन देत आपल्या समस्यांचा पाढाच वाचला..
सदर महिलेला न्याय मिळतो की नाही याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे..
एमडी टीव्ही न्यूज देखील त्याचा पाठपुरावा करत राहणार..
संजय मोहिते शहादा प्रतिनिधी एम.डी.टी.व्ही न्यूज शहादा