महाडिकांच्या गाडीचे दरवाजे उघडणार्‍यांना घाबरण्याची गरज नाही : अमल महाडिक

0
253
89a75388 158e 4463 93b4 49807e9c31e1

सातारा – माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या गाडीचे दरवाजे उघडणार्‍या आ. सतेज पाटील यांना घाबरण्याची मला गरज नाही, असा पलटवार माजी आ. अमल महाडिक यांनी केला. महादेवराव महाडिक कसबा बावड्यात पाटील यांच्या घरी एकटेच गेले तेव्हा महाडिकांना बावड्यात फिरू न देण्याची वल्गना करणारे आ. पाटील बाहेरदेखील आले नाहीत. निदान अशा लोकांनी तरी महाडिक घाबरले, भ्याले असे म्हणू नये, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

ADVERTISEMENT

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

SPONSORED CONTENT
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांचे अर्ज अवैध ठरल्यानंतर आ. सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत महाडिक यांच्यावर आरोप केले. त्याला अमल महाडिक यांनी सायंकाळी पत्रकार परिषदेतून प्रत्युत्तर दिले. रडीचा डाव आम्ही खेळत नाही. आ. सतेज पाटील यांनी १८९९ सभासद अपात्र ठरवून स्वत: रडीचा डाव खेळण्यास सुरुवात केली. आम्ही रडणारे नाही, लढणारे आहोत. घाबरणारे तर मुळीच नाही. कोणाला घाबरावे ? जे महादेवराव महाडिक यांच्या गाडीचा दरवाजा उघडत होते त्यांना का घाबरावे ? २९ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरल्यानंतर त्यांना काळा दिवस आठवला, परंतु १८९९ सभासद अपात्र ठरविताना त्यांना काही वाटले नाही.

सहकारामध्ये तोच खरा काळा दिवस होता. १८९९ सभासद अपात्र ठरविले त्यावेळी आम्ही न्याय देवतेवर विश्वास ठेवून लढत राहिलो. त्यांच्यासारखे शासकीय यंत्रणेवर दबाव आणल्याचा किंवा अधिकार्‍यांना हाताशी धरण्याचा आरोप आम्ही करत बसलो नाही. आम्ही लढत राहिल्यामुळे यश मिळाले. निवडणुकीत २९ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरल्याने तेच आता घाबरले आहेत. पोट नियमांचा अभ्यास करून त्यांना हरकती घेण्यास कोणी अडविले नव्हते, असेही महाडिक म्हणाले.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

शासकीय यंत्रणेवर दबाव आणल्याचा त्यांचा आरोप चुकीचा आहे. ते ही लोकप्रतिनिधी आहेत. पालकमंत्री म्हणून काम केले आहे. त्यांनी माहिती घ्यावी. अधिकार्‍यांना विचारावे, असे सांगून महाडिक म्हणाले, महाविकास आघाडीच्या नावाखाली आ. पाटील यांनी राजाराम कारखान्याची निवडणूक पक्षीय पातळीवर नेली. गोकुळ, जिल्हा बँक, त्यांच्या संस्था अशी संपूर्ण यंत्रणाच निवडणुकीसाठी वापरत आहेत. सभासद हे कारखान्याचे मालक आहेत. गेली २७ वर्षे आम्ही सभासदांच्या दारात जातो. परंतु त्यांना आताच आम्ही दारात गेल्याचे दिसत असेल तर त्यात आमचा काय दोष?

राजाराम साखर कारखान्याच्या बाबतीत आ. पाटील यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना आम्ही उत्तरे देण्याचा प्रयत्न करत असतो. आ. पाटील यांच्या डॉ. डी. वाय. पाटील साखर कारखान्याबाबतीत आम्ही तुलना केली तर त्यामध्ये काय गैर आहे ? त्या कारखान्यातील कारभाराची तुलना करत आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी द्यावीत, असेही महाडिक म्हणाले. यावेळी माजी चेअरमन दिलीप पाटील, भीमा कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक, डॉ. मारुती किडगावकर, दिलीप उलपे, प्रशांत तेलवेकर, किरण जाधव आदी उपस्थित होते.

संदीप कारंडे, जिल्हा प्रतिनिधी एम.डी.टी.व्ही. न्यूज सातारा

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here