जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबीयांना मारण्याची दिली धमकी…!

0
294

मुंबई :१६/२/२३

शॉर्ट हेडलाईन
1 राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबीयांना मारण्याची दिली धमकी
2 ठाण्याच्या या सहाय्यक आयुक्ताचा यात समावेश : आव्हाडांचा आरोप

राज्याचे माजी गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना संपवण्यासाठी तिहार जेलमधील गँगस्टर सुभाष ठाकूर उर्फ बाबाजी ला सुपारी दिल्याची कबुली देणारा ऑडिओ व्हायरल झालाय.

या क्लिपमध्ये ठाणे महापालिकेतील सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या नावाचा उल्लेख आहे. पोलिसांनी आहेर यांना नुकतंच ताब्यात घेतलं. मात्र ऋता आव्हाड यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

त्यांनी नताशाचं नाव घेतलं माझ्या जावयाचे नाव घेतलं, कोण आहे हा बाबाजी, सगळे पुरावे असतांना कायद्याचे सो कॉल्ड लोक कुठे आहेत, असही ऋता आव्हाड यांनी सांगितलं.

या क्लिपमधील शंभर टक्के आवाज महेश आहेरांचा आहे याची पोलिसांनी निरपेक्षपणे चौकशी करावी अशी मागणी ऋता आव्हाड यांनी केली आहे.
एम.डी.टी.व्ही न्यूज ब्युरो मुंबई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here