कोल्हापूर :२९/३/२३
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे तत्कालीन संचालक सर्जेराव पाटील-पेरिडकर, विलास गाताडे व आसिफ फरास यांची ‘ईडी’मार्फत चौकशी सुरू झाली आहे.
हे तिघेही मुंबईत असून, बुधवार (दि. 29) पर्यंत ही चौकशी पूर्ण होण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्यालयासह गडहिंग्लज व कागल तालुक्यातील कापशी येथील शाखेवर दि. 1 फेब—ुवारी रोजी ‘ईडी’ने छापा घातला होता.
या छाप्यामध्ये ब्रिक्स कंपनी तसेच साखर कारखान्यांना करण्यात आलेल्या कर्जपुरवठ्यासंबंधीची कागदपत्रे ताब्यात घेतली होती.
त्यानंतर या कर्जपुरवठ्यास मंजुरी देणार्या सन 2015 ते 2021 या कालावधीतील संचालकांना ‘ईडी’ने नोटिसा पाठविण्यास सुरुवात केली.
पहिल्या टप्प्यात माजी संचालक सर्जेराव पाटील-पेरिडकर,विलास गाताडे व आसिफ फरास यांना नोटीस पाठविण्यात आली.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती ! त्यासाठीक्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu
सध्या त्यांच्याकडे चौकशी केली जात आहे. या चौकशीत त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीची ‘ईडी’ पडताळणी करणार आहे.
ही चौकशी पूर्ण झाल्यानंतर अन्य संचालकांना ‘ईडी’च्या नोटिसा येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सारिका गायकवाड,प्रतिनिधी,कोल्हापूर एम डी टी व्ही न्यूज