..खरा निर्णय जनतेच्या कोर्टात; सहानुभूती ही उद्धव ठाकरे यांच्या बाजूने – छगन भुजबळ

0
133

नाशिक :१८/२/२३

शॉर्ट हेडलाईन
१. या निकालानंतर नाशिक येथे छगन भुजबळ यांनी साधला पत्रकारांशी संवाद
२. आयोगाच्या निकालावर ओढले ताशेरे

निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांचा पक्ष बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाला शिवसेना हे नाव व पक्षाचं धनुष्यबाण हे चिन्ह मिळाले आहे.
या निकाला नंतर नाशिक येथे छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालानंतर प्रथम प्रतिक्रिया ना.छगन भुजबळ यांनी दिली माध्यमांना,नाशकात पत्रकार परिषदेत बोलतांना …

आयोगाच्या निकालावर भुजबळांनी अनेक सवाल उपस्थित केलेत.

ते म्हणाले की, असा निर्णय येईल असा संशय उद्धव ठाकरे यांना होता.

यामुळे त्यांनी सांगितलं होतं की, सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर तुम्ही निर्णय घ्या. मात्र निवडणूक आयोगाकडून निर्णय घोषित करण्यात आला.

खरतर त्यांनी दोन चार दिवस थांबायला काय हरकत होती ?

ते म्हणाले की, देशात असे जर निर्णय लागत असतील तर पुढे अनेक प्रश्न निर्माण होतील. ही मोठी विचित्र परिस्थिती लोकशाहीत निर्माण होऊ शकते. बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसांसाठी ही शिवसेनेची चळवळ सुरू केली.
त्यांनी पक्ष स्थापन केला.

स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पुढे नेली.त्यानंतर पुढचे पक्षप्रमुख हे उद्धव ठाकरे असतील, असा निर्णय झाला.

आता अचानक असे निर्णय आले.याला सुद्धा उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्टात आव्हान देऊ शकतील असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की,निवडणूक आयोग हे निष्पक्षपणे निर्णय घेतात. देशातील केंद्रीय संस्था यांच्याबाबत नक्की काय आहे, हे जनतेला माहित आहे.

त्यामुळे असं होणार, हे लोकांना माहित होतं. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्या गटाला एक जोड शब्द देऊन ते शिवसेना म्हणून राहतील.

राहिला प्रश्न तो निशाणीचा तर आता समाज माध्यमांवर एक मिनिटांत निशाणी आणि नाव ताबोडतोब जाईल.यात फार काही गोंधळ उडणार नाही.फक्त उद्धव ठाकरे यांच्यासोबत जायचं की एकनाथ शिंदे यांच्यासोबत जायचं, हे मतदारांना ठरवायचं आहे.

पण खरा निर्णय हा जनतेच्या कोर्टात आहे. याची सहानुभूती ही उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आहे, असं माझं मत आहे असे त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.त्यांनी आयोगावर प्रश्नचिन्ह उभं केलं आणि ठाकरेंची पाठराखण केलीय.

तेजस पुराणिक जिल्हा प्रतिनिधी एम.डी.टी.व्ही न्यूज,नाशिक ..

photo of tejas

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here