नंदुरबार : १०/३/२०२३
महाराष्ट्रात पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसाला भाव नसल्याने दोन पैसे अधिक मिळण्याच्या अपेक्षेने गुजरात राज्यात कापूस विक्री करून परतणाऱ्या दोघा शेतकऱ्यांना रस्त्यातच लुटून घेतल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली आहे.
भालेरच्या दोघा शेतकऱ्यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून व पिस्तूल चा धाक दाखवून त्यांच्याकडील 13 लाख 94 हजाराची रोकड एका स्विफ्ट डिझायर मधून आलेल्या चौघांनी पळवून नेली .
या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत नंदुरबार शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार तालुक्यातील भालेर येथील शेतकरी हंसराज दगाजी पाटील व सुनील गंगाराम पाटील या दोघे शेतकऱ्यांनी धुळे तालुक्यातील जुनवणे येथील व्यापारी उमेश पाटील यांच्या मध्यस्थीने दोन आयशर ट्रक भरून कापूस गुजरात राज्यातील ढोलके यागावी विक्रीसाठी नेला होता.
महाराष्ट्रात कापसाला 7 हजार ते 7 हजार दोनशे भाव मिळत असल्याने दोन पैसे अधिक मिळण्याच्या अपेक्षेने दोघा शेतकऱ्यांनी त्याठिकाणी 7 हजार 500 रुपये क्विंटल या दराने प्रत्येकी 85 क्विंटल कापूस ढोलके येथे विक्री केल्याची माहिती शेतकऱ्यांनी एम. डी. टी.व्ही. सोबत बोलतांना दिली.
रात्री 1.30 वाजेच्या सुमारास नंदुरबार येथील जगतापवाडी जवळ उतरून तिघेजण दुचाकीने भालेरकडे रवाना झाले तर आयशर ट्रक धुळेकडे रवाना झाला.
दरम्यान, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे
याबाबत सुनील गंगाराम पाटील यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादवि कलम 394/ 34 व भारतीय हत्यार कायदा कलम नुसार गुन्हा दाखल केला आहे
घटनास्थळी पोलीस अधीक्षक पी आर पाटील, शहर पोलीस निरीक्षक व सहकार्यानी भेट देऊन पाहणी केली. तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील करीत आहेत.
जीवन पाटील, कार्यकारी संपादक एम.डी. टी.व्ही. नंदुरबार