शिरपूर :- अंकलेश्वर बुऱ्हाणपूर राष्ट्रीय महामार्गावरील शिरपूर चोपडा रस्त्यावरील बभळाज गावाजवळ दि.१० जूनच्या रात्री ९ वाजेच्या सुमारास गुजरात राज्य परिवहनच्या बसने दुचाकीला धडक दिल्याने दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
शिरपूर तालुक्यातील तरडी येथील विकास मंगल पाटील (वय ३३ ) व भागवत कालिदास पाटील ( वय ४९ ) हे दोघेही १० जूनच्या रात्री ९ वाजेच्या सुमारास दुचाकीने बभळाजकडून तरडीकडे जात असतांना चोपडाकडून शिरपूरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या एसटी बसने (क्र. जीजे.१८ झेड.८१३३) त्यांना धडक दिली. बसची जबर धडक बसल्याने दोघे दुचाकीस्वार काही अंतरावर फेकले गेले. यात दोघे दुचाकीस्वार यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात दोघांचाही मृत्यू झाल्याने तरडी गावावर शोककळा पसरली आहे.
हे सुध्दा वाचा:
महिला आयोगाच्या रुपाली चाकणकरांसह राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील नवापूरला येणार ! – MDTV NEWS
जळगावातील खेळाडूंसाठी क्रीडा मंत्र्यांकडून मोठे गिफ्ट … ३६ एकर जागा केली मंजूर ! – MDTV NEWS
GOOD NEWS… लिटरमागे १० रुपयांनी स्वस्त झाले – MDTV NEWS
योगराज साहेबराव पाटील यांच्या फिर्यादीवरून बसचालक दीपककुमार मनिलाल दर्जी ( वय ५०, रा. बी ३०१ देवाशिष, विट्टल प्लाझा जवळ मीराज सिनेमा हासपुरा, अहमदाबाद ) यांच्याविरोधात भादवि कलम ३०४ अ २७९,३३७,३३८,४२७ मोवाका. कलम १८४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास थाळनेरचे पोलीस उपनिरीक्षक उमेश बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.
राज जाधव. एमडी.टीव्ही. न्युज, शिरपूर