आमदार पाडवींच्या विकास निधीतून अक्कलकुवा ग्रामपंचायतीला दोन घंटागाडी… !

0
295

अक्कलकुवा :- विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांच्या स्थानिक विकास निधीतून अक्कलकुवा ग्रुप ग्रामपंचायतीला दोन घंटा गाड्या देण्यात आल्या. आज या दोन्ही घंटागाडींचा लोकार्पण सोहळा आमदार पाडवी यांच्याहस्ते करण्यात आला.

1854d880 dded 4991 93d4 acc9a657501a

अक्कलकुवा शहरातील घराघरातुन घन कचरा नेऊन त्या घन कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी आमदार आमश्या पाडवी यांनी ग्रामपंचायतीला दोन घंटा गाड्या आपल्या आमदार निधीतून उपलब्ध करून दिल्या. या घंटा गाडीचा लोकार्पण सोहळा ग्रामपंचायतीच्या प्रांगणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार आमश्या पाडवी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून नंदुरबार जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती शंकर पाडवी, अक्कलकुवा पंचायत समितीचे सभापती नानसिंग वळवी, गटविकास अधिकारी लालू पावरा, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उप सभापती टेडग्या वसावे, तालुका शेतकरी सह संघाचे चेअरमन पृथ्वीसिंह पाडवी, उप सभापती अशोक पाडवी, ग्रामपंचायत विभागाचे विस्तार अधिकारी युवराज पवार, अक्कलकुवा शहराच्या लोकनियुक्त सरपंच उषाबाई बोरा आदी उपस्थित होते.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

हे सुध्दा वाचा

नंदुरबारात रंगणार “खासदार चषक” क्रीडा महोत्सव…. खा.हिना गावितांच्या वाढदिवसानिमित्त अर्हत प्रतिष्ठानतर्फे क्रीडा सप्ताह ! | MDTV NEWS

बापरे … झोपलेला महिलेला बिबट्याने उचलून नेले … तळोदा तालुक्यातील घटना; लचके तोडल्याने महिला गतप्राण | MDTV NEWS

Good News… राज्यातील सर्व आश्रमशाळांना मिळणार वॉशिंग मशिन | MDTV NEWS

नंदुरबार : पोलीस दलातील पाच अधिकाऱ्यांची बदली… | MDTV NEW

यावेळी आमदार आमश्या पाडवी यांच्या स्थानिक विकास निधीतून दिलेल्या घंटागाडींचे आमदार पाडवी यांच्या हस्ते पूजन करुन घंटागाडींचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे जिल्हा संघटक लक्ष्मण वाडीले, शेतकरी सह.संघाचे व्हाईस चेअरमन अशोक पाडवी, नवरतन टाक, रविंद्र चौधरी, युवासेना जिल्हा समन्वयक रोहित चौधरी, शिवसेना शहर प्रमुख रावेंद्रसिंह चंदेल, कुणाल जैन, रोहित सोनार, तुकाराम वळवी, राजेंद्र, वसावे, कुवरसिंग वसावे, अश्विन तडवी, किरण चौधरी, गुलाम कादर बलोच, महावीर डागा, दीपक मराठे, जितेंद्र लोहार, दीपक मराठे, स्वप्निल जैन, किशोर ठाकुर, जेष्ठ नागरिक किशोर हीरे, विक्रमसिंग चंदेल, मजीद मक्रानी आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन व आभार ग्राम विकास अधिकारी नितीन जावरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

शुभम भन्साली. एमडी.टीव्ही. न्युज, अक्कलकुवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here