Ayodhya Ram Mandir : उद्धव ठाकरेंना राम मंदिर सोहळ्याचे निमंत्रण नाही; 22 जानेवारीला काय करणार..?

0
153
uddhav-thackeray-is-not-invited-to-the-ayodhya-ram-mandir

Ayodhya Ram Mandir – उत्तर प्रदेशात 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्या मंदिरात प्रभू रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी अनेक बड्या व्यक्तींना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. मात्र, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हे निमंत्रण मिळालेले नाही. यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे.

‘एम.डी टीव्ही’ चं Facebook  Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

‘एम.डी टीव्ही’ चं Telegram  Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज स्पष्ट केले की ते 22 जानेवारीला अयोध्येत जाणार नाहीत. मीनाताई ठाकरे जयंतीनिमित्त दादर शिवाजी पार्क येथे बोलताना ते म्हणाले, “अयोध्येतील राम मंदिराचा उद्घाटन सोहळा धार्मिक आणि अस्मितेचा असावा. हा अभिमान, अस्मिता आणि आनंदाचा क्षण आहे. या सोहळ्याला कोणताही राजकीय रंग देऊ नये. राम आमचा आहे. आम्ही केव्हाही अयोध्येला जाऊ शकतो.”

उद्धव ठाकरे यांनी 22 जानेवारीला नाशिकमधील काळाराम मंदिरात दर्शन घेणार असल्याचेही सांगितले. प्रभू रामचंद्र काही वर्ष पंचवटीला देखील वास्तव्यास होते. त्यामुळे त्या दिवशी नाशकात गोदावरीच्या तीरावर एक महाआरती देखील होईल, असे त्यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे यांना राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी निमंत्रण दिले गेले नसल्याने शिवसेना आणि भाजप यांच्यात राजकारण पेटले आहे. शिवसेनेकडून भाजपवर टीका करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here