Ayodhya Ram Mandir – उत्तर प्रदेशात 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्या मंदिरात प्रभू रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी अनेक बड्या व्यक्तींना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. मात्र, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हे निमंत्रण मिळालेले नाही. यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे.
‘एम.डी टीव्ही’ चं Facebook Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
‘एम.डी टीव्ही’ चं Telegram Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!
हे देखील वाचा:
कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक कराया पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज स्पष्ट केले की ते 22 जानेवारीला अयोध्येत जाणार नाहीत. मीनाताई ठाकरे जयंतीनिमित्त दादर शिवाजी पार्क येथे बोलताना ते म्हणाले, “अयोध्येतील राम मंदिराचा उद्घाटन सोहळा धार्मिक आणि अस्मितेचा असावा. हा अभिमान, अस्मिता आणि आनंदाचा क्षण आहे. या सोहळ्याला कोणताही राजकीय रंग देऊ नये. राम आमचा आहे. आम्ही केव्हाही अयोध्येला जाऊ शकतो.”
- Shiv Sena Protest Nandurbar: शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत जाहीर केल्याने शिवसेनेत संताप; मुख्यमंत्र्यांना पाठवली ५ हजार १ रुपयांची ‘दिवाळी भेट’..!
- Asaduddin Owaisi On Elon Musk: ‘मोदींचा विरोध करू, पण गोऱ्यांचा हस्तक्षेप नाही!’; ओवैसींचा एलन मस्क यांना थेट इशारा
- Dharmendra Pradhan Resign: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश..!
- Vaibhav Sooryavanshi: 18 चेंडूत अर्धशतक, तरीही मॅन ऑफ द मॅच मयंक यादव का?
- Sonam Wangchuk Fast Ended: सोनम वांगचुक यांचे २६ दिवसांचे उपोषण मागे; सरकारने मागण्या केल्या मान्य..!
उद्धव ठाकरे यांनी 22 जानेवारीला नाशिकमधील काळाराम मंदिरात दर्शन घेणार असल्याचेही सांगितले. प्रभू रामचंद्र काही वर्ष पंचवटीला देखील वास्तव्यास होते. त्यामुळे त्या दिवशी नाशकात गोदावरीच्या तीरावर एक महाआरती देखील होईल, असे त्यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे यांना राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी निमंत्रण दिले गेले नसल्याने शिवसेना आणि भाजप यांच्यात राजकारण पेटले आहे. शिवसेनेकडून भाजपवर टीका करण्यात येत आहे.

