शिवसेना अन् धनुष्यबाण मिळाल्यानंतर एकनाथ शिंदेंनी बदलला प्रोफाईल Photo!
मुंबई :१७ /२/२०२३
- शॉर्ट हेडलाईन
- १. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिल्याचा महत्त्वपूर्ण निकाल दिला निवडणूक आयोगाने
- २. निवडणूक आयोगाच्या या निकालानंतर दिली एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिल्याचा महत्त्वपूर्ण निकाल निवडणूक आयोगाने दिला आहे.
🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!
कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.
हे देखील वाचा:
निवडणूक आयोगाचा हा निकाल म्हणजे सत्याचा, लोकशाहीचा तसंच बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांचा विजय असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
ऐकू या नेमकं काय म्हणालेत एकनाथ शिंदे …
या निकालानंतर राज्यभरात ठिकठिकाणी एकनाथ शिंदेंच्या शिवसैनिकांकडून जल्लोष करण्यात येत आहे.दरम्यान निवडणूक आयोगाच्या या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरचा फोटो बदलला आहे. भगव्या बॅकग्राऊंडवर धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव असलेला फोटो एकनाथ शिंदे यांनी प्रोफाईल फोटो म्हणून ठेवला आहे.

निवडणूक आयोगाने 78 पानांचा निकाल दिला आहे, या निकालात शिवसेनेचा इतिहासच बदलला गेला आहे. ठाकरे आणि शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाला मोठ्या प्रमाणावर प्रतिज्ञापत्र देण्यात आली होती, पण निवडणूक आयोगाच्या निकालात आमदार आणि खासदार कुणाकडे हाच कळीचा मुद्दा ठरला.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत 55 पैकी 40 आमदार आणि 13 खासदार गेले, याशिवाय प्रतिनिधीसभेतही बहुमत आपल्या बाजूने आहे, असा दावा शिंदेंकडून निवडणूक आयोगाकडे करण्यात आला होता.
एम डी टी व्ही न्यूज ब्युरो,मुंबई

