अकोला -२८/७/२३
गुरुवार दि. २७ जुलै २०२३ ला दुपारी 4 वाजता श्री सत्तेश्वर मंदिर गांधीग्राम अकोला येथे अकोला तालुका शिवसेनेच्या वतीने दुग्धाभिषेक व महाआरती संपन्न झाली.निमित्त होते माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाचे ..
WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईनकरा. https://bit.ly/3UoK7E0
शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना शिवशंभुनीं सावरण्याची शक्ती द्यावी, या महाराष्ट्रात किंबहुना देशात शिवस्वराज्य उभे करून या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील समस्त शिवसैनिकांसोबतच समस्त जनतेलाही उद्धवजी ठाकरे साहेबांचा आधार कायम मिळावा , आम्ही सामान्य शिवसैनिक उद्धवजी ठाकरे यांच्या पाठीशी समर्थपणे उभे राहून शिवसेनेचा भगवा अखंड महाराष्ट्रात कायम फडकवीत राहू, हा संदेश देण्यासाठी आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे आयोजन तालुका प्रमुख प्रा नितीन सुभाषराव ताथोड यांनी केले होते. या प्रसंगी शिवसेना माजी जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर, यांच्यासह सर्व शिवसैनिक यावेळी उपस्थित होते..
प्रतिनिधी ,अशोक भाकरे ,अकोला एम डी.टी.व्ही.न्युज…