प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत लाभार्थी गृहकर्जदारांना केलं अनुदान वाटप..

0
608

तळोदा :२४/२/२३

तळोदा येथील दि.हस्ती को-ऑप बँक लि.दोंडाईचा शाखा तळोदातर्फे प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत चार गृहकर्जदारांना हाउसिंग कर्ज अनुदान मंजुर झालेले आहे.

म्हणून हस्ती बँक तळोदा शाखेने गृहकर्जधारकांना पात्र लाभार्थींना अनुदानाचे वितरण करण्यात आले.
यावेळी गृहकर्जधारकांना प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत सबसिडीचे वितरण तळोदा शाखेचे अध्यक्ष किर्तीकुमार शाह, समिती सदस्य अरुण मगरे, कुशेंद्र सराफ, शाखा व्यवस्थापक किशोर चौधरी आदी उपस्थित होते.

प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत ज्यांच्याकडे घर नाही अशा व्यक्तींना स्वतःचे घराचे स्वप्न साकार करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत सबसिडी दिली जाते.

या अंतर्गत हस्ती बँकेने नॅशनल हाउसिंग यांच्याशी करार करून बँकेने हाऊसिंग साठी प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत मिळणाऱ्या हाऊसिंग सबसिडीचे पात्र लाभार्थी कर्जदारांना वितरण करण्यात आले.

यात लाभार्थी यांना अनुदान पत्र देण्यात आले.
प्रधानमंत्री आवास योजना सुरु करण्यासाठी हस्ती बँकेचे अध्यक्ष कैलास जैन, व्यवस्थापकीय संचालक प्रकाश कुचेरिया, सहव्यवस्थापक माधव बोधवाणी, कार्यकारी अधिकारी सतिष जैन, सुनिल गर्गे आदींनी प्रयत्न केले.

शासकिय योजनेत सहभाग म्हणून हस्ती बँकेने विविध कर्जवारील व्याज तसेच नियम व अटी सरळ व सोपे केलेले आहेत. बँकेच्या ग्राहक व सभासदांनी व नविन घर घेणाऱ्या ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन हस्ती बँक शाखा समितीचे अध्यक्ष, सदस्य व शाखा व्यवस्थापक यांनी केले.

महेंद्र सूर्यवंशी,तळोदा प्रतिनिधी एम डी टी व्ही न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here