पालघर : ७/३/२०२३
पालघर तालुक्यातील सफाळे जव्हार विक्रमगड मोखाडा या भागात काल रात्री मुसळधार पावसाने चांगलीच हजेरी लावली.. पावसाच्या सरी कोसळल्याने आंबा काजू शेती भाजीपाला तसेच वीट भट्ट्यांचे नुकसान झालं..
आज जिल्ह्यात अधिक भागात दिवसभर ढगाळ वातावरण पसरल्याचे पहावयास मिळालं..
रविवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास जव्हार वाडा सफाळा येथे मुसळधार दृष्टी झाली..
तर वाडा तलासरी मोखाडा भागात किरकोळ पाऊस झाल्याची नोंद आहे..
अवकाळी पावसाने फळ पिकांना मोठ्या प्रमाणात नुकसान केलं असून या वातावरणाचा आपोआपच रोगराई वाढण्यात हातभार लागलाय..
शेती बागायती भाजीपाला यांचं अतोनात नुकसान झालंय व रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जाते..
हे हि पहा :धुळे जिल्ह्यात प्रचंड गारपीट
पुढील काही दिवस मान्सून दृष्टी वेगाने होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे..
त्यामुळे तो हातातोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांचा हिरावला जाणार असल्याच्या भीतीने शेतकरी राजा चिंता तूर आहे..
ऋषिकेश जाधव पालघर प्रतिनिधी एम.डी.टी.व्ही न्यूज