शेती पिकांना अवकाळी पाऊसाचा फटका ,बळीराजा हवालदिल ..

0
724

धुळे -२३/५/२३

धुळे तालुक्यातील खंडलाय बु खंडलाय खुर्द, बांबुर्ले नेर, शिरधाने, अकलाड मोराने, लोणखेडी, सह परीसरात अचानक आलेल्या पावसाने शेती पिकांचे मोठे प्रमाणात नुकसान झालेले आहे.
तसेच पंचक्रोशीतीत जोरदार वादळी वारा व मुसळधार पाऊसामुळे बऱयाचश्या शेतकरी बळीराज्यांची कांदाचाळ, भुईमूग, भाजीपाला, मका यांची प्रचंड प्रमाणावर मोठे नुकसान झाले
माध्यमिक शाळेजवळील, खंडलाय खुर्द येथे देखील कांदाच्या चाळीतील ८ ते १० ट्रॅक्टर. कांदा शेतात पाणी घुसून खराब झाला आहे.
तसेच गावाजवळील, जंगलातील काही विजेचे पोल अर्ध्यात मुडून व तारा जमिनीवर येऊन खाली कोसळली.
अनावधानाने जीवितहानी टळली.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंगन्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
जनावरांचा चारा पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले.
काही झाडे रस्त्यावर पडल्यामुळे रस्ते वाहतूक कोलमडली ,
शेतकऱ्यांच्या शेतातली मोठ – मोठी झाडे जमिनीतून उन्मळून पडल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान देखील झाल आहे.
म्हणून MSEB कर्मचारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल, कृषिसेवक,पोलीस पाटील, सर्व शासकीय यंत्रणांनी ताबडतोब येऊन नुकसानीचा पंचनामा करावा व झालेल्या नुकसानीबाबत सर्व शेतकऱ्यांना भरपाई मिळावी अशी मागणी ग्रामपंचायत गटप्रमुख आबा पगारे, सरपंच, उपसरपंच, सदस्य, सामाजिक कार्यकर्ते नारायण माळी, आंनदा पाटील, दादा कोळी, सुरेश कोळी, बारकू निकम, इ मार्फत करण्यात आली आहे.
MD TV न्यूज धुळे तालुका प्रतिनिधी ,दिलीप साळुंखे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here