नंदुरबारात म.जोतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

0
106
phule ambedkar e1491498771997

नंदुरबार – राष्ट्रपिता ज्योतीराव फुले व राष्ट्रनिर्माते डॉ.बाबासाहेब यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त कोकणी हिल परिसर व बामसेफतर्फे सभ्यता व कलाचारीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी दि.१३ एप्रिल रोजी ‘फुले-आंबेडकरी गाणी व आम्ही भारताचे लोक’ हे नाटक सादरीकरण तर दि.१४ एप्रिल रोजी भारतीय संविधान कार्यान्वयन चेतना तथा मूलनिवासी बहुजन एकजुट रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

भारताच्या संविधानात या देशातील प्रत्येक नागरीकाचे जीवनयापन उन्नत राहील व सगळ्यांचा समान विकास होईल, असे आश्वासन दिले गेलेले आहे. परंतु संविधानाला कार्यान्वित करण्याच्या प्रक्रियेत देशातील शासक जाती अक्षम्य दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे शिक्षण, आरोग्य आणि रोजगारासंबंधित मोठी समस्या या देशात निर्माण झालेली दिसून येते. त्यामुळे आपणास भारतीय नागरिक म्हणून भारतीय संविधानाच्या कार्यान्वयांच्या प्रक्रियेत भारतीय संविधान समजून घ्यावे लागेल व देशातल्या समस्याग्रस्त नागरिकांना समजावून द्यावे लागेल. त्याच अनुषंगाने अर्थात भारतीय संविधान सम्मान सुरक्षा आणि संवर्धन राष्ट्रव्यापी महाजनजागरण अभियान अंतर्गत राष्ट्रपिता जोतीराव फुले व राष्ट्रनिर्माते डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त बामसेफ व सहयोगी संघटना यांच्या मार्फत दि.१३ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता कोकणी हिल परिसर नंदुरबार येथे मूलनिवासी सभ्यता व कलाचारीक कार्यक्रमात ‘फुले- आंबेडकरी गाणी व आम्ही भारताचे लोक’ हे नाटक सादर होणार आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

तसेच दि.१४ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह नंदुरबार ते राष्ट्रनिर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा साक्री नाका नंदुरबार अशी भारतीय संविधान कार्यान्वयन चेतना तथा मूलनिवासी बहुजन एकजुट रॅलीच्या माध्यमातून अभिवादन करण्यात येणार आहे. सायं ६ वाजता कोकणी हिल परिसर नंदुरबार येथे अभिवादन व आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नागरीकानी उपस्थित राहण्याचे आवाहन पावबा ठाकरे, दिपक पानपाटील, प्रशांत साळवे, निखिल चित्ते, अमोल पिंपळे, प्रमोद निकुंभे, रविशंकर सामुद्रे, संजय मोहिते, प्रविण खरे, विजय शिरसाठ, गौतम भामरे, बी.एस.पवार, ललिता शिरसाठ, परमेश्‍वर मोरे, संजय जाधव, संतोष नागमल, गोरखनाथ बिरारे, धनंजय वाघ, हेमकांत मोरे यांनी केले आहे.

एम.डी.टी.व्ही. न्युज, नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here