भारतीय जनता पार्टीच्या वतीने भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशाने महाराष्ट्रात वीर सावरकर गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!
हे देखील वाचा:
कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.
🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
त्यानुसार नंदुरबारला दिनांक 6 एप्रिल गुरुवारी रोजी सायंकाळी 04.30 वा. शहरातील मोठा मारुती मंदिरावरुन भव्य वीर सावरकर गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रा मोठा मारुती मंदिरापासुन छपत्रती नाटयमंदिर, पंडीत दिनदयाल चौक, जुन्या नगरपालिकेजवळ नेहरु पुतळयावरुन हाट दरवाजा, हुतात्मा स्मारक येथे समारोप होणार आहे. हया गौरव यात्रेत आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, खा.डॉ.हिना गावित, भाजपाचे प्रदेशाचे महामंत्री विजय चौधरी, जि.प.अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित उपस्थीत राहणार आहेत.
वीर सावरकरांच्या या गौरव यात्रेत नंदुरबार शहर व ग्रामीण भागातील विविध संघटना, शिक्षण संस्था, व्यापारी प्रतिष्ठाने, व्यायाम शाळा, सामाजिक राजकीय क्षेत्रातले सर्व पक्षीय कार्यकर्ते आदींनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस निलेश माळी व शहराध्यक्ष नरेंद्र माळी यांनी केली आहे.
