Nandurbar News Today : वाहनांच्या नंबर प्लेटकडे अधिकाऱ्यांचा कानाडोळा…!

0
95
Vehicles-without-number-plates-or-using-fancy-number-plates

Nandurbar News Today – सारंगखेडा अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे परिसरात अनेक वाहने बिना नंबर प्लेट्ची अथवा फॅन्सी नंबर प्लेट्सचा वापर करताना दिसून येतात. ज्यांना नंबर प्लेटवर महाराष्ट्र शासन पोलीस तथा तत्सम चिन्ह तथा नाव लिहिण्याचा अधिकार नाही असेही चिन्ह त्याचा नाव लिहिलेले आढळून येते .अनेक चार चाकी वाहनांमध्ये महाराष्ट्र शासन ,पोलीस अशा प्लेट्स दिसून येतात.

रस्त्यावरील वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी व सुरळीतपणे होण्यासाठी परिवहन विभाग प्रत्येक वाहनांना विशिष्ठ नंबर देतात , परंतू अलीकडे शहादा ते दोंडाईचा रस्त्यावर विनानंबरची अनेक गौण खनिज वाहतूक करणाऱ्या अनेक जुनी वाहने रस्त्यावरुन धावतांना दिसत आहे . या वाहनांवर आळा घालणे गरजेचे आहे .

शहादा तालुक्यात अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांवर आरटीओ यांच्या अटी शर्तीनुसार वाहनाच्या दर्शनी भागावर वाहन क्रमांक नंबर प्लेट स्पष्ट आणि ठळक अक्षरात लावणे बंधणकारक असतांना सुध्दा वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून वाहने भरधाव वेगाने रस्त्यावर धावत आहेत.

‘एम.डी टीव्ही’ चं Facebook  Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

अनेकांच्या नंबरप्लेटवर नंबरऐवजी राजकीय पक्ष आणि विभागांची नावे लिहिलेली असतात. तर काही वाहनांवर नंबर प्लेट्स नसतात  जिल्ह्यातील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे वाहनचालक बिनधास्त वाहने चालवत आहेत.  वाहनांच्या पुढील आणि मागील दोन्ही नंबर प्लेटवर नंबर लिहिण्याचा नियम आहे.  ट्रक, मोटारसायकल, डंपर, ट्रॅक्टर, जुनी वाहने यांच्यात जास्त समावेश आहे. प्लेटवर कोणत्याही प्रकारची रचना असू नये, फक्त संख्या नेहमीच्या पद्धतीने स्पष्टपणे विहित आकारात लिहावी. 

Vehicles without number plates or using fancy number plates  Nandurbar news today

मात्र जिल्ह्यातील वाहनचालक नियम धुडकावून, न घाबरता वाहने चालवत आहेत.  काही वाहनांवर तर नंबर प्लेटवर लिहिलेलेच नसते. आणि लिहितात तर नंबरही व्यवस्थित दिसत नसतात. अनेक वाहनांच्या नंबर प्लेटवर क्रमांकांऐवजी राजकीय पक्ष आणि  विभागांची नावे, पदनाम लिहिलेले असतात. अनेकजण नंबरप्लेटशिवाय रस्त्यावर धावत आहेत. ( Nandurbar News Today )

या वाहनांवर स्वार असलेले लोकही तपासादरम्यान राजकीय पक्षाचे व विभागीय कर्मचारी असल्याचे भासवतात व पळ काढतात. बहुतेक वाहनांवर क्रमांक इतक्या स्टायलिश पद्धतीने लिहिलेले असतात की कोणालाच नंबर समजू शकत नाही.  अनेक वाहनांवरील नंबर प्लेट्सच्या डिझाईनही वेगवेगळ्या असतात.  काही वाहनांच्या नंबर प्लेट चमकदार असतात तर काही लहान आकाराच्या आणि इतर डिझाइनमध्ये असतात.  त्यामुळे प्लेट्स वर लिहिलेले क्रमांक स्पष्ट होत नाहीत. याकडे आरटीओ निरिक्षक आणि चौकशी अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे .

किरण बिडकर . उपप्रादेशिक  परिवहन अधिकारी .नंदूरबार .

वाहनांच्या नंबरप्लेटवर स्पष्टपणे न दिसल्यास किंवा अशी वाहने रस्त्यावर दिसल्यास कारवाई करण्यात येईल . तसेच नंबर प्लेटवरील क्रमांक हे सामान्य पध्दतीने लिहिलेले असावेत , अन्यथा अशा वाहनांवर कारवाई करण्यात येईल .

प्रतिनिधी सारंगखेडा – गणेश कुवर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here