ब्राह्मणपूरी येथे हद्दपार आदेशाचे उल्लंघन : गुन्हा दाखल

0
97
haddapar

नंदुरबार : शहादा तालुक्यातील ब्राह्मणपूरी येथे हद्दपार आदेशाचे उल्लंघन करुन वावरतांना आढळून आल्याप्रकरणी एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहादा तालुक्यातील ब्राह्मणपूरी येथील अजय उर्फ टायगर राजेंद्र पावरा याला नंदुरबार जिल्ह्यातून दोन वर्षाकरीता हद्दपारी आदेश देण्यात आले होते. तरी सुद्धा अजय पावरा याने हद्दपार आदेशाचे उल्लंघन करुन ब्राह्मणपूरी गावातील बसस्थानक परिसरातील मोकळ्या जागेत वावरतांना आढळून आला.

याबाबत पोशि.अजितसिंग नागलोत यांच्या फिर्यदीवरुन शहादा पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.रमण वळवी करीत आहेत.

एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो, नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here