सकल मराठा समाजाचा लाक्षणिक उपोषण, शासनाला कुणबी प्रमाणपत्रासाठी इशारा |warning to government for Kunbi certificate

0
424
warning to government for Kunbi certificate

Sakri News : सकल मराठा समाजाच्या मागण्यांसाठी संघर्षरत असलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना पाठिंबा देण्यासाठी साक्री तालुक्यातर्फे आज लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या उपोषणाला सर्वपक्षीय पदाधिकारी आणि सर्व जाती-जमातीतील नागरिकांनी पाठिंबा दर्शविला.

उपोषणस्थळी तहसीलदार साहेबराव सोनवणे यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, शासनाने लवकरात लवकर तात्काळ सरसकट महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे. मागणी मान्य न झाल्यास यापुढे अमरण उपोषणास बसण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

download

लाक्षणिक उपोषणात किशो वाघ, हिम्मत सोनवणे (गोसावी), केशव शिंदे, भूषण माळी, बंडू गीते, कल्पेश पाटील, इंजिन शिवलीयव देशमुख, जयेश सोनवणे, माहारू तात्या मारनर, किरण दहीते, पंजाबराव गांगुर्डे, श्रीकांत भोसले, रमेश सरक, मा.खा.बापू चौरे, आबासाहेब सोनवणे, विजय भोसले, सचिन सोनवणे, बाबा पठाण, जी.टी.मोहिते, भानुदास गांगुर्डे, जगदीश शिंदे, कल्पेश सोनवणे, शितल सनेर, जितेंद्र मराठे, गिरीश नेरकर, चंद्रकांत देसले, अरूण अहिरराव विकी गीते, नितीन गुप्ता आदीसह तालुक्यातील सर्व राजकीय पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाज बांधवांनी भेट देत आपला पाठींबा दर्शविला.

उपोषणस्थळी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, “शासनाने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर आम्ही आमचा लढा अधिक तीव्र करू. आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here