रेल्वे बोगद्याखाली पाणीच पाणी

0
154

वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज

नंदुरबार: शहरातील दोन भागांना जोडणारा व अत्यंत वर्दळीचा असलेल्या नळवा रस्त्यावरील रेल्वे बोगद्याखाली पाणी साचल्याने तलावाचे स्वरूप प्राप्त होत आहे. यातून मार्ग कसा काढावा असा प्रश्न यामार्गे ये – जा करणाऱ्या वाहनधारकांना पडला आहे. बोगद्याखाली मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने वाहतूक ठप्प होत असून वाहन जाताना अंगावर पाणी उडत असल्याने वाहनधारकांमध्ये वाद देखील होत आहेत. बोगद्याखाली उन्हाळ्यात पाणी साचत असल्याने अशा समस्यांना तोंड द्यावे लागत असून पावसाळ्यात काय परिस्थीती असेल ? त्यामुळे याठिकाणी पावसाळ्यापूर्वीच उपाययोजना करणे आवश्यक असल्याची मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

नंदुरबार शहर रेल्वे पट्ट्याच्या दोन विभागात वसले आहे. बसस्थानक, रेल्वेस्थानक, बाजारपेठ, शाळा, महाविद्यालये ही जुन्या शहरात तर नळवा रोड व पट्ट्याच्या पलीकडे मोठ्या वसाहतीसह इंग्लिश मेडीयम शाळा आहेत.नंदुरबार शहरातील सुमारे ४० टक्के वसाहत ही रेल्वे पुलाकडे वास्तव्यास आहे. त्यामुळे उड्डानपुलासह नळवा रस्त्यावरून वाहतूक सुरु असते. नळवा मार्गावर रेल्वे मार्गाखाली बोगदा तयार करण्यात आला आहे. सुमारे ३ कोटीचा निधी खर्चुन रेल्वे अंडरपास नंदुरबार शहरातील उड्डाणपूलावरील वाहतूकीची कोंडी होवू नये, म्हणून फायदेशीर आहे. जुन्या रेल्वे बोगद्यातून देखील बऱ्याचदा वाहतूकीची कोंडी होत असल्याने पर्यायी अंडरपास बनविण्यात आला आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

रेल्वे विभागाकडे बोगद्याच्या कामासाठी कोट्यवधींचा निधी देण्यात आला खरा, मात्र तांत्रिक बाबी चुकल्याने बऱ्याचदा पाणी साचल्याने अंडरपास बंद होतो. परिणामी शासनाचा निधी पाण्यातच जात असल्याचे बोलले जाते. या रेल्वे बोगद्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प होत आहे. यामुळे वाहनधारकांना अडचणींना सामोरे जावे लागले. अंडरपासच्या दोन्ही बाजुला वाहतूक ठप्प झाल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. पावसाळ्यात अशी समस्या उद्भवू नये यासाठी आताच उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत शहरातील नागरिकांनी व्यक्त केले आहे
एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here