प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पाणी आणणार : डॉ. गावित..

नंदुरबार :८/३/२०२३

केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पाणी आणणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी केले.

ADVERTISEMENT

डॉ. गावित म्हणाले, आपल्या जिल्ह्यात नद्या व धरणामध्ये पुरेसा पाण्याचा साठा उपलब्ध असून हे पाणी प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत आणण्यासाठी प्रयत्न करणार असून या भागात एकदाची पाण्याची सोई झाल्यावर येथील शेतमालावर प्रक्रिया करण्यासाठी या भागात लहान मोठे कारखाने सुरु करु.

यामुळे येथे रोजगाराची संधी उपलब्ध होऊन स्थलातर थांबेल.

SPONSORED CONTENT

🎯 ताज्या अपडेट्स थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा!

कोणतीही महत्त्वाची बातमी किंवा सरकारी जीआर मिस करू नका. आजच ग्रुप जॉईन करा.

🟢 ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

ज्या गरीब व्यक्तींना घरे नाही अशांना आदिवासी विकास विभागामार्फत मोठया प्रमाणात घरकुलाचे काम घेण्यात येत असून ज्या व्यक्तींचे ‘ड’ यादीत नाव सर्व आदिवासी बांधवांना 100 टक्के घरे देण्यात येईल.

या भागातील विविध विकासकामासाठी पुढील वर्षी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.

केंद्र सरकारने नवीन डी.पी, नवी सबस्टेशन सुरु करणे तसेच जुन्या वीजतारा बदलण्यासाठी निधी दिला असल्याचे त्यांनी सांगितले.

नंदुरबार तालुक्यातील तलवाडे, बलवंड, खर्दे.खु. येथील सभागृह व रस्ता क्रॉक्रीटिकरण अशा विविध विकास कामांचे भूमीपूजन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी पालकमंत्री डॉ. गावित बोलत होते.

यावेळी खासदार डॉ.हिना गावित, सरपंच (बलवड) सागर पाटील, सरपंच (तलवाडे) ताराबाई राजपूत, सरपंच (खोंडामळी) युवराज देसले, सरपंच (भोणे) पावबा धनगर, सरपंच नितीन पाटील (खर्दे. खु.) माजी जि.प.सदस्य रवी पाटील, सागर तांबोळी यांच्यासह लोकप्रतिनिधी, उपसरपंच व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

प्रविण चव्हाण एम. डी. टीव्ही न्यूज नंदुरबार.

RECOMMENDED FOR YOU

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here