धडगाव :१८/२/२३
शॉर्ट हेडलाईन
1 रेशन दुकानदारावर करा निलंबनाची कार्यवाही- ग्रामस्थांची मागणी
2 धडगाव तहसीलदारांना दिलं ग्रामस्थांनी मागणीचे निवेदन
धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागात वसलेला आहे मौजे झुम्मट हे गाव.. अद्यापही आहे रेशन धान्यापासून वंचित.. नेमकं काय आहे हा प्रकार..
याबाबत सविस्तर माहिती अशी की, या रेशन दुकानदाराविषयी ग्रामस्थांनी तक्रार अर्ज दाखल करून देखील अधिकाऱ्यांकडून या दुकानदाराची पाठ राखण केली जात आहे.
धान्याची अफरातफर केली जात असल्याची चौकशी अंतिम निष्पन्न झालं. नुकतच जिल्हा पुरवठा अधिकारी यांना याबाबत अहवाल पाठवण्यात आला त्यानंतर देखील या रेशन दुकानदारावर कायदेशीर कारवाई करण्यात आली नाही.
दुकान रद्द होण्याची प्रक्रिया होईपर्यंत गावाच्या जिल्हा परिषद शाळेच्या आवारात धान्य वाटप करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र हा दुकानदार इथपर्यंतच थांबला नाही ते धान्य तो स्वतःच्या घरी घेऊन गेला.
याबाबत ग्रामस्थांना कुठलेही भनक पडू दिली नाही. त्यामुळे या गावातील ग्रामस्थ रेशन धान्यापासून वंचित आहेत. नुकताच त्यांनी धडगाव तहसीलदारांना निवेदन दिल.
स्थानिक अधिकाऱ्यांकडून भ्रष्टाचाराला खतपाणी घातले जाते का काय असा प्रश्न ग्रामस्थांनी विचारलाय.
सदर रेशन दुकानदारावर तात्काळ निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी अन्यथा आम्हाला न्याय मिळण्यासाठी 13 मार्चपासून तहसील कार्यालयासमोर आम्ही आमरण उपोषण करू असा इशारा या निवेदनातून ग्रामस्थांनी दिलाय.
यावेळी एडवोकेट वसंत वळवी सरपंच यांच्यासह अपसिंग वळवी, सायसिंग वळवी, जयवंत वळवी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गोपाल पावरा धडगाव प्रतिनिधी एम.डी.टी.व्ही न्यूज