नंदुरबार:१३/०२/२०२३
… जिनका कोई नही होता उनका खुदा होता है, तेरा वर्षाची रोशनी देवाच्या भरोसे आपलं जीवन जगते बाल वयातच वडिलांचा आधार गेला तर तर काही महिन्यानंतर आईला देखील तिची साथ सोडली..
ही रोशनी आहे शहादा तालुक्यातील मेहतर वस्ती परिसरातील गरीब कुटुंबातील रोशनी.. बाल वयातच आई-वडिलांचा आधार गेला रोशनी समोर कौटुंबिक जबाबदारीचा डोंगर उभा राहिला… लोकांच्या घरी धुणे भांडी करून रोशनी आपल्या शिक्षणाचा खर्च भागवते.. तिच्या भावनांना तिने वाट मोकळी करून दिली ऐकूया रोशनी काय म्हणते..
रोशनी शाळेत वेळेवर हजर राहते तिला शिक्षणाची खूप आवड आहे पण परिस्थिती समोर ती काय करणार? तिच्या निराधार आयुष्याला हवी आहे दानशूर यांच्या मदतीची साथ.. स्वप्न तिने उराशी बाळगले डॉक्टर होण्याचं ते मध्येच भंग होऊ नये हे प्रतिकूल परिस्थितीन आशा करूया अनेक दानशूर पुढे येतील आणि तिच्या या आयुष्याला उभ करण्यात साथ देतील..
एमडीटीव्हीच्या या वृत्ताची दखल घेऊन अनेक दानशूर पुढे आलेत तर निश्चितपणे आम्ही त्यांचं स्वागतच करू.. सलाम तिच्या जिद्दीला आणि तिच्या संघर्षमय प्रवासाला..
निलेश अहेर,
शहर प्रतिनिधी एम डी टी व्ही न्यूज नंदुरबार