अनैतिक संबंधातून पत्नीने काढला पतीचा काटा..

0
208

शिरपूर :५/३/२०२३

24 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास तरडी शिवारातील गोविंद परदेशी यांच्या मक्याच्या शेतात एका अनोळखी तरुणाचा ओढणीने हात पाठीमागे बांधून गळा आवळून ठार मारण्यात आलं..

हे हि पहा: https://bit.ly/3ZnAQxL

या गुन्ह्याची कबुली संशयित सुशील पावरा राहणार होळनांथे, दिनेश कोळी जितू पावरा आणि त्यांना मदत करणारी महिला साथीदार अश्यांना पोरबंदर गुजरात येथून ताब्यात घेण्यात आलं..

गुन्हा रजिस्टर नंबर 30/2023 नुसार भारतीय दंड विधान कलम 302 ,201 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

ही मोहीम यशस्वी केली धुळे जिल्हा पोलीस प्रमुख संजय बारकुंड यांच्या मार्गदर्शनाखाली..

अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, प्रभारी उपविभागीय अधिकारी शिरपूर विभाग अन्साराम आगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे हेमंत पाटील, उमेश बोरसे बाळासाहेब सूर्यवंशी, अमोल जाधव ,सुनील पाटील किशोर पाटील, थाळनेर पोलीस स्टेशनचे किशोर चव्हाण, श्याम वळवी ,संजय धनगर योगेश दाभाडे, धनराज मालचे दिलीप मोरे या कर्मचाऱ्यांनी मोहीम यशस्वी करण्यात योगदान दिलं..

थाळनेर पोलिसांसह स्थानीक गुन्हे पोलिसांचं यासाठी कौतुक करण्यात येत आहे..
राज जाधव शिरपूर तालुका ग्रामीण प्रतिनिधी एम.डी. टी.व्ही न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here