धुळे शहरातील कचरा संकलनाचा ठेका स्वयंभू या संस्थेने घेतलाय.. या कंपनीचे व्यवस्थापक अभिजीत फडतरे यांनी अध्यक्ष रणजीत भोसले यांच्या सह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले..
ही कंपनी शहरातील कचरा नीट संकलन करीत नसल्याचा जाब विचारण्याच्या रागातून हे खोटे गुन्हे दाखल झाल्याची माहिती समोर येते.. या कंपनीवर वरदहस्त कोणाचा असा सवाल महाविकास आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादीने विचारलंय..
आघाडीच्या नेत्यांना यांना त्या कारणास्तव कुठल्या गुन्ह्यात अडकवायचं हा कुटील डाव ईडी आणि खोके सरकारने सध्या घेतलेय… धुळ्यात भाजपची सत्ता असून विरोधकांना कोंडीत पकडण्यासाठी या ना त्या कारणाने स्वरूपाचे गुन्हे दाखल करून अशी खेळी करण्याचा प्रयत्न सुरू आहे..
पंधरा दिवसात गुन्हा दाखल केलेला मागे घ्यावा अन्यथा साखरे हायवे पूर्णपणे जाम करू असं निवेदनातून सांगण्यात आलं… यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे धुळे जिल्हा अध्यक्ष सुरेश सोनवणे यांनी प्रतिक्रिया दिली.
यावेळी त्यांच्या समवेत पक्षाचे धुळे जिल्हा कार्याध्यक्ष जितेंद्र मराठे नरेंद्र तोरवणे गिरीश नेरकर अक्षय सोनवणे पवन संदनशिव,कल्पेश सोनवणे , हरीश मंडलिक संदीप देवरे उपस्थित होते
जितेंद्र जगदाळे साक्री तालुका प्रतिनिधी एमडीटीव्ही न्यूज…