शहाद्यात लग्नास नकार दिल्याने महिलेस जीवे मारण्याची धमकी

0
189


शहादा : – लग्नास नकार दिल्याच्या रागातून रस्त्यात गाडी अडवित अंगावर अ‍ॅसीड फेकण्याचे सांगत शिवीगाळ करून महिलेला जीवेठार मारण्याची धमकी देणाऱ्या एकाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शहादा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहादा येथील नितीन नगरात राहणारी एका ३३ वर्षीय महिला ही मित्रासोबत गाडीने (क्र.जीजे २६ एबी ४११४) घरी जात होती. यावेळी लग्नास नकार दिला या कारणातून चेतन मुलचंद तिरमले याने रस्त्यात गाडी अडविली, तसेच हातातील दगडाने गाडीच्या साईका बाजूला मारुन दरवाजाच्या बाजूला टोचा पडला. तसेच बोनटवर बुक्क्याने मारत सदर महिलेला माझ्यासोबत लग्न कर नाही तर जीवेठार मारेन व अ‍ॅसीड टाकेल अशी धमकी दिली.

याबाबत महिलेने शहादा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चेतन मुलचंद तिरमले (रा.नागसेन नगर, शहादा) याच्याविरुद्ध भादंवि कलम ३४१, ४२७, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास किरण पावरा करीत आहेत.

एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो, नंदुरबार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here