धडगाव /नंदुरबार -१८/४/२३
वडफळ्या रोशमाळ बुद्रुक कार्यालयासमोर महिलांनी दिला ठिय्या..
पाण्याच्या प्रश्नांना धडगाव तालुक्यातील संजय गांधी नगर येथील महिला अधिक आक्रमक झाल्याचे पहावयास मिळाले..
महिनाभरापासून पाणीपुरवठा ठप्प झाल्याने सदर वॉर्डात पाणी समस्या गंभीर झाली आहे..
परिणामी महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते..
जवळपास सातशे लोक वस्तीचा वार्ड क्रमांक नऊ असलेल्या भागात पाणीपुरवठा योजना कार्यान्वित नाही..
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
पाण्याच्या टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो पण ते पण फक्त कागदावरच की काय असा प्रश्न महिलांना पडलाय. महिलांना गावातून थेट एक ते दीड किलोमीटर भटकंती करावी लागते व पाणी आणावे लागते..
अखेर आक्रमक भूमिका घेत हातात पाण्याचा हंडा घेत थेट नगरपंचायत कार्यालय महिलांनी गाठलं..
संबंधित अधिकाऱ्यांसमोर वाढ 9 मधील समस्यांचा पाढा वाचला..
सदर नगरपंचायत चे मुख्य कार्यकारी अधिकारी हे फक्त सत्ताधारी पक्षाचेच आहेत का या सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांकडे ते कधी वाचा फोडणार, समस्या कधी सोडणार यासह समस्यांचा भडीमारच उपस्थित अधिकाऱ्यांवर महिलांनी केला..
नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत निवेदन सादर केलं..
अधिकाऱ्यांकडून लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल असं आश्वासन उपस्थित महिलांना देण्यात आलं..
त्यामुळे एकूणच आदिवासी आणि ग्रामीण भागात महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावं लागतं यापेक्षा दुःख वेगळं सांगता येणार नाही..
ही शोकांतिका आहे तेथील ग्रामीण भागातील प्रशासनाची आणि तेथील अधिकाऱ्यांची की जाणीवपूर्वक या प्रश्नांकडे पाठ फिरवत आहे कि माहीत असून मूग गिळून गप्प आहेत? या भागातील मिनेश पाडवी यांनी एमडीटीव्ही प्रतिनिधींशी संवाद साधला..
लवकरात लवकर पाणी प्रश्न मिटेल आणि नगरपंचायत प्रशासनाकडून महिलांना न्याय मिळेल ही आशा करूया.
गोपाल पावरा ,धडगाव प्रतिनिधी, एम.डी. टी.व्ही. न्यूज