भडगाव :२७/२/२०२३
भडगाव शहरातील लक्ष्मण मंगल कार्यालयात नुकतंच महिला सक्षमीकरण मेळाव्याचा आयोजन करण्यात आलं होतं. पाचोरा येथील किशोर आप्पा पाटील बहुउद्देशीय सामाजिक संस्था, एन आर एल एम पंचायत समिती भडगाव, कृषी विभाग भडगाव आणि नगरपालिका भडगाव यांच्या संयुक्त समन्वयातून हा मेळावा घेण्यात आला.
प्रमुख उपस्थिती किशोर आप्पा पाटील व सुनीता पाटील यांची होती. नाशिक विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी महिलांना मार्गदर्शन केलं.
कृषी विभागाच्या सूक्ष्म खाद्य उद्योग योजनेतून महिलांनी लाभ घेऊन उद्योजक बनण्याचा कानमंत्र घेतला.
महिला बचत गटांनी वैयक्तिक महिलांनी बेरोजगार युवकांनी योजनेअंतर्गत पस्तीस टक्के व जास्तीत जास्त दहा लक्ष रुपयापर्यंत अनुदान उपलब्ध असून त्यांनी संबंधित विभागाशी संपर्क साधण्याचं अधिकाऱ्यांनी मार्गदर्शनातून सांगितलं. विविध प्रकारचे छोटे व्यवसाय त्यात केळी बटाटा वेफर्स पशुखाद्य युनिट मसाला कांडप युनिट विविध बेकरी प्रॉडक्ट्स दुग्धजन्य पदार्थ पनीर तूप निर्मिती लोणचे जेली आवळा कॅन्डी आवळा सुपारी आदी व्यवसाय सुरू करण्यासाठी महिलांना ही योजना लाभदायी ठरू शकते.
दहा लक्ष रुपयापर्यंत अनुदान देय असून जास्तीत जास्त महिलांनी याचा वापर करावा आणि योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन केलं.
प्रतिनिधी स्वरूपात रंजना महाले यांना 4,74 हजारांचा चेक व डी डी च वाटप किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. मोहन वाघ यांच्या हस्ते पौष्टिक तृणधान्य सेल्फी पॉइंट चा उद्घाटन करण्यात आलं.
या कार्यक्रमात पौष्टिक तृणधान्य आरोग्य विषयक माहितीचे फ्लेक्स आणि प्रदर्शन ठेवण्यात आलं होतं.
अधिकाऱ्यांना देखील सेल्फी पॉइंट येथे जाऊन सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. यावेळी विविध बचत गटाच्या महिला यांनी या मेळाव्यात सहभाग घेतला..
कृषी विभागाचे विविध अधिकारी आणि या संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
सतीश पाटील भडगाव प्रतिनिधी एम.डी .टी.व्ही न्यूज