नंदुरबार ते वाकाचार रस्ता कामाला लवकरच सुरुवात होणार – खा. डॉ. हिना गावित

0
147

रत्यावर सुरू आहेत अपघाताच्या मालिका

शेवाळी फाटा-नेत्रंग रस्त्याला मंजुरी

c8dee6b7 20b4 4694 b97d 489ff258d269

नंदुरबार : नंदुरबार ते वाकाचार रस्त्याच्या कामाला येत्या १५ ते २० दिवसात व नवापूर चौफुली ते सी.बी.पेट्रोल पंपपर्यंतच्या रस्त्याच्या कामाला येत्या दोन दिवसात सुरुवात होणार असल्याची माहिती खा.डॉ.हीना गावित यांनी दिली आहे.

शेवाळी-नेत्रंग राष्ट्रीय महामार्ग क्र.७५३ (बी) या महामार्गाची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली आहे. त्यातच नवापूर चौफुली ते वाकाचार रस्तापर्यंतचा रस्ता अपघातांना निमंत्रण देत होता. मात्र या राष्ट्रीय महामार्ग दुरुस्ती करण्याच्या कामासाठी केंद्र शासनाने तत्वत: मंजूरी दिली आहे.


शेवाळी-नेत्रंग राष्ट्रीय महामार्ग वाहनधारकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्यावर पावलागणिक खड्डे आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणावर अपघात घडत होते. भाजपा नेते विक्रांत मोरे यांनी पत्रकार परिषद घेवून तात्काळ दुरुस्ती न झाल्यास सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला होता. मनसेचे रस्ते आस्थापना प्रदेश उपाध्यक्ष अतुल पाटील यांनीही शहादा तालुक्यातील रस्त्यांच्या स्थितीबाबत पत्र व्यवहार केला होता. याशिवाय विविध पक्ष, संघटनांनी आंदोलन देखील केले होते.

64cae768 885a 4f62 82a8 495c9f4a8116

यामुळे सदरची बाब गांभीर्याने घेवून नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या खा.डॉ.हीना गावित यांनी पाठपुरावा केल्यानंतर शेवाळी-नेत्रंग या राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्ती करण्याच्या कामासाठी केंद्र शासनाने तत्वत: मंजूरी दिली आहे. तसेच याच महामार्गावरील नंदुरबार ते तळोदा या सुमारे २९ कि.मी.अंतराच्या रस्त्याच्या कॉँक्रीट चौपदरीकरणासाठी लवकरच रस्ते मंत्रालयाकडून मंजूरी मिळणार असल्याचे खा.डॉ.हीना गावित यांनी म्हटले आहे.

8ae9a06a 2d7c 46f5 9f95 fb8c06fcc79e

याशिवाय नवापूर चौफुली ते सी.बी.पेट्रोल पंप या आठ कि.मी.रस्त्याच्या कामाला येत्या दोन दिवसात सुरुवात होणार आहे. तसेच सुदर्शन पेट्रोल पंप ते अंतुर्ली या ११ कि.मी.अंतराच्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी २० ते २५ दिवसात सुरुवात होणार आहे. तर सारंगखेडा ते शहादा या १४ कि.मी.रस्त्याचे मजबूतीकरण व डांबरीकरण निविदा प्रक्रिया प्रगतीत असल्याची माहिती खा.डॉ.हीना गावित यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here