कराड /सातारा -१०/४/२३
सातारा जिल्ह्यात कोरोना बाधित सक्रिय रुग्णांच्या संख्या शंभराजवळ पोहचली आहे.
आज आलेल्या अहवालात 13 जणांचे अहवाल कोरोना बाधित आढळले आहेत. तर काल 5 जण बाधित आढळले होते.
आज 3 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे असून शासकीय नियमांचे पालन करावे व सर्दी, खोकला, घशातील त्रास जाणवू लागल्यास कोरोना चाचणी करुन घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती ! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu
जिल्ह्यात आज आलेल्या आवाहलात 13 कोरोना बाधित रुग्णाची नोंद झाली आहे. यासाठी जिल्ह्यात 172 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. जिल्ह्यात सध्या 97 सक्रिय (अॅक्टिव्ह) रूग्ण असून सध्या 20 रूग्णावर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. आज नमूने चाचणी 172 (एकूण 26 लाख 40
हजार 849)
आज बाधित वाढ- 13 (एकूण 2 लाख 80 हजार
941)
आज कोरोनामुक्त- 3 (एकूण 2 लाख 74 हजार
85)
आज मृत्यू- 0 (एकूण 6 हजार 730)
उपचारार्थ रूग्ण -97
रूग्णालयात उपचार -20
आज आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार देशात गेल्या 24 तासांत 5 हजार 337 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 11 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात 32 हजार 814 रूग्ण सक्रिय आहेत.
महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात 542 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे तर 1 कोरोना बाधिताचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात 4 हजार 500 सक्रीय रूग्णसंख्या झाली आहे.
संदीप कारंडे ,कराड प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज