भडगाव /जळगाव – १९/४/२३
येथील छत्रपती शिवराय फौंडेशन संचालित यशवंत पब्लिक स्कूलचे पाच दिवशीय निवासी संस्कार शिबिरआयोजित करण्यात आलं होतं ..
नुकताच समारोप करण्यात आला.
85 विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला.
या शिबिरात व्याख्याते प्रदीप देसले,श्रीमती सीमाताई शर्मा,गणेश निकम,शालीग्राम निकम,प्रा आर एम पाटील,गुलाबराव पाटील यांची विविध विषयांवर व्याख्याने झाली.
अनुभव व बोध कथन, दररोज ध्यान धारणा, संघटन शक्ती वाढवणारे खेळ, परिसरातील गावांमध्ये जाऊन वृक्ष दिंडी द्वारे जनजागृती करण्यात आली
2022 मध्ये विविध गावांमध्ये लावलेल्या वृक्षांना भेटी व पथनाट्यद्वारे जनजागृती करण्यात आली.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
सायकल रॅली काढून हिरवळ जनजागृती अभियान राबवत या शिबिराचा समारोप करण्यात आला.
शिबीरासाठी संस्थेचे अध्यक्ष परमानंद सूर्यवंशी,मुख्याध्यापिका जयश्री सूर्यवंशी,गणेश अहिरे,शिक्षक व शिक्षकांनी परिश्रम घेतले.
सतीश पाटील .भडगाव प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज