होय ,अधिकारी व्हायचंय.. ईथं करा अर्ज ..

0
214

पुणे – २६/६/२३

अनुसूचित जातीच्या विद्यार्थी तरुणांसाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्यामार्फत विविध योजनांद्वारे अधिकारी होण्यासाठी प्रक्षिक्षण दिले जाते.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग – राज्यसेवा परीक्षा २०२३-२४ या प्रशिक्षणासाठी तब्बल ४०० प्रशिक्षणार्थी जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यात पुणे साठी २०० व नाशिक साठी २०० पदवीधर तरुणांना अधिकारी होण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
त्यामध्ये ३० टक्के जागा महिलांसाठी,०४ टक्के जागा दिव्यांग असलेल्या व्यक्तींसाठी,०५ टक्के जागा अनुसूचित जाती अंतर्गत वंचित जातीमधील त्यात वाल्मिकी, होलार,बेरड,मातंग,मांग,मादगी इत्यादी विद्यार्थ्यांकरिता आरक्षित असणार आहेत.
एकुण जागांच्या ०५ टक्के जागा विशेष बन म्हणुन राखीव ठेवण्यात येणार आहेत.
पात्रता :
*१)महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
*२) उमेदवाराकडे महाराष्ट्रातील अनुसूचित जातीचा दाखला व अधिवास असावा.
*३) उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.
*४) उमेदवाराचे वय महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवेच्या अटी व शर्ती नुसार असावे ..
*५) महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २०२३-२४ मध्ये घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा बसण्यासाठी पात्र असावा.
*६) जास्तीत जास्त ८ लाखापर्यंत उत्पन्न मर्यादा असावी. वरील पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करावा.
अर्ज दाखल करण्याची शेवटचा दिनांक १० जुलै ३०२३ राहणार आहे.प्रशिक्षण कालावधी १२ महिन्याचा असणार आहे. पात्र उमेवारांची चाळणी परीक्षा ३० जुलै २०२३ रोजी घेण्यात येणार आहे. उमेदवाराची गुणानुक्रमे प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येणार आहे.
अनुसूचित जातीच्या पदवीधर तरुणांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे कडून प्रसिद्ध करण्यात आले आहे.
नितीन गरुडसह ब्युरो रिपोर्ट ,एम डी टी व्ही न्यूज पुणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here