नंदुरबार :- नंदुरबार तालुक्यातील शनीमंडळ येथील साधना विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आज दि.२१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करण्यात आला.
योगा दिनानिमित्ताने योग शिक्षक ए.आर.पाटील, श्रीमती.एम.एम.महाजन , मुख्याध्यापक कुंदन पाटील यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्व सांगून योगा प्रात्यक्षिक करून दाखविले. योगा केल्याने शरीर कसे निरोगी राहते, त्याचे फायदे यावेळी योग शिक्षकांनी प्रत्यक्ष कृतीतून विद्यार्थ्यांना समजवून सांगितले. यावेळी प्राणायाम तडासन, कपालभारती, भ्रामरी प्राणायाम, वृक्षासन,पादहस्तासन, अर्थ चक्रासन, त्रिकोणासन, भद्रासन, वज्रासन, अर्ध उल्टरासन, पूर्ण उल्टरासन, मक्रासन, शलआसन, अनुलोमविलोम, शीतली प्राणायाम आदी योगासन प्रकार घेण्यात आले.
हे सुध्दा वाचा
Good News… राज्यातील सर्व आश्रमशाळांना मिळणार वॉशिंग मशिन | MDTV NEWS
ACB Trap … नंदुरबार पं.स.चे विस्तार अधिकरी जाळ्यात ! | MDTV NEWS
नंदुरबार : पोलीस दलातील पाच अधिकाऱ्यांची बदली… | MDTV NEWS
म्हसावद पोलिसांनी रोखला पिप्राणी येथील बालविवाह ! | MDTV N
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक कुंदन पाटील, पर्यवेक्षक व्ही.बी.सूर्यवंशी, यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
जयेश पाटील. एमडी.टीव्ही. न्युज नंदुरबार.